---Advertisement---

पुढील महिन्यात टीम इंडिया करणार ऑस्ट्रेलियाशी दोन‌ हात; या शहरामध्ये रंगणार थरार

On: शुक्रवार, नोव्हेंबर 18, 2022 10:56 PM
Team India
---Advertisement---

पुरुष क्रिकेटच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर आता महिला क्रिकेटचाही नवा हंगाम सुरू होत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाचे यजमानपद भूषवेल. ऑस्ट्रेलिया संघ या दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. बीसीसीआयने शुक्रवारी ‌(18 नोव्हेंबर) याबाबतची अधिकृत घोषणा केली.

बीसीसीआयने शुक्रवारी ही घोषणा करताना म्हटले, भारत पुढील महिन्यात ‌‌ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे.‌ ही मालिका पाच सामन्यांची असेल. विशेष म्हणजे हे पाचही सामने मुंबईतच खेळले जातील.‌ मालिकेतील पहिले दोन सामने नेरळ येथील ‌‌‌‌‌डी वाय पाटील स्टेडियमवर खेळले जातील. तर उर्वरित तीन सामने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया म्हणजेच ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होईल.

पहिला सामना 9 डिसेंबर रोजी झाल्यानंतर दुसरा सामना त्याच मैदानावर ‌‌11 डिसेंबर रोजी होईल. त्यानंतर पुढील तीन सामने अनुक्रमे  14 डिसेंबर, 17 डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी खेळले जातील. भारतीय संघाची या मालिकेसाठी अद्याप घोषणा झाली नसली तरी, विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ समोर असल्याने हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातच भारतीय संघ मैदानात उतरताना दिसेल.

(India Womens Host T20 Series Against Australia Womens)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याला मी रोखणार नाही, पण…’, आयपीएल 2023मधून बाहेर पडणाऱ्या कमिन्सचे ‘या’ अष्टपैलूबद्दल वक्तव्य
व्हिडिओ एक, मूड्स अनेक! आयसीसीने दाखवली विराटची टी20 विश्वचषकातील प्रत्येक रिऍक्शन, एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---