टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीतून बाहेरचा रस्ता धरावा लागला. असे असले, तरीही भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने कुणालाही न जमलेला पराक्रम गाजवला. विराट या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. मागील काही वर्षांपासून विराटला सूर गवसत नव्हता. त्याला चांगल्या धावा करता येत नव्हत्या. मात्र, आता विराट भलत्याच फॉर्मात आला आहे. त्याने या स्पर्धेत आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला आहे. याव्यतिरिक्त विराट कोहलीचे टी20 विश्वचषक 2022मधील वेगवेगळे मूड्स देखील पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने (ICC) त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहली (Virat Kohli) याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराटचे टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील प्रत्येक क्षणाचे वेगळे रूप पाहायला मिळाले. यामध्ये तो कधी निराश दिसला, तर कधी खुश. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर तो भलताच आनंदी दिसला. यासोबतच अनेदका तो आपल्या संघसहकाऱ्यांसोबत मजा मस्ती करतानाही दिसला.
आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करत मजेशीर कॅप्शनही दिले. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “विराट कोहलीचे अनेक मूड.” विराटचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. चाहते या व्हिडिओवर लाखो लाईक्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
टी20 विश्वचषकातील विराटची कामगिरी
भारतीय संघाचा या टी20 विश्वचषक स्पर्धेतील प्रवास उपांत्य सामन्यापर्यंत येऊन संपला. मात्र, या स्पर्धेत विराट कोहली याने त्याला ‘रनमशीन’ का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याने या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळले. यामध्ये त्याने 98.66च्या सरासरीने एकूण 296 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 4 अर्धशतकेही झळकावली. यामध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध रचलेली नाबाद 82 धावांची यादगार खेळी साकारली. ही त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. (Virat Kohli different moods t20 world cup 2022 in one video see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंद्रे रसेलने हद्दच केली पार! थेट मॉलमध्येच झाला NUDE, फोटो पाहिला का?
‘आमचे खेळाडू वयाने कमी असतील, पण…’, न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय कर्णधाराचे जबरदस्त वक्तव्य