Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंद्रे रसेलने हद्दच केली पार! थेट मॉलमध्येच झाला NUDE, फोटो पाहिला का?

आंद्रे रसेलने हद्दच केली पार! थेट मॉलमध्येच झाला NUDE, फोटो पाहिला का?

November 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Andre-Russell

Photo Courtesy: Instagram/ar12russell


जगभरातील काही क्रिकेटपटू सोडले, तर इतर सर्वच सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातील काही या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ते दररोज आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. मात्र, काही वेळा ते हद्दच पार करतात, ज्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगते. असेच काहीसे आता वेस्ट इंडिजचा विस्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेल याच्याबाबत घडले आहे. चला तर रसेलने असे काय केले आहे, हे जाणून घेऊयात…

रसेलने नेमकं काय केलं?
खरं तर, आंद्रे रसेल (Andre Russell) शॉपिंग मॉलमधील एका वॉर्डरोब सेक्शनमध्ये न्यूड झाला होता. यावेळी त्याने सेल्फीही घेतला. विशेष म्हणजे, हा सेल्फी त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही शेअर केला. आता त्याचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. ट्विटरवरही चाहते हा फोटो भलताच व्हायरल करत आहेत.

#Russell #andrerussell #cringe pic.twitter.com/DLQ5ur4AGl

— @cringe tweets (@cringetweet0) November 18, 2022

याव्यतिरिक्त रसेलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटोही अपलोड केला होता. यामध्ये तो त्याचे सिक्स पॅक ऍब्ज दाखवत होता. हा फोटो शेअर करत त्याने लक्षवेधी कॅप्शनही दिले होते. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बोला कमी, करा जास्त.” त्याच्या या पोस्टवर 1 लाखाहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता.

View this post on Instagram

A post shared by Andre Russell🇯🇲 Dre Russ.🏏 (@ar12russell)

रणवीर सिंगही झाला होता न्यूड
आंद्र रसेलपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हादेखील न्यूड झाला होता. रणवीरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून न्यूड फोटो शेअर केले होते. त्याच्या या फोटोंमुळे जेव्हा देशात खळबळ माजली, तेव्हा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याने दावा केला होता की, या फोटोंसोबत कुणीतरी छेडछाड केली आहे. या फोटोत रणवीर त्याचे खासगी अवयव दाखवत होता. आता चाहते रसेलची तुलना रणवीरसोबत करत आहेत. यासोबतच मजेशीर कमेंट्स आणि ट्वीटही करत आहेत.

Andre Russell Instagram post. Ranveer Singh lite 😂#INDvNZ #INDvsNZ#NZvIND #NZvsIND pic.twitter.com/uxKy831pyB

— Cricket Master 🏏 (@Master__Cricket) November 18, 2022

Cricket Fans to Andre Russell rn:#nakedِ pic.twitter.com/FafpNqsSTl

— फिलासफर©™ (@battyphilo) November 18, 2022

 

 

रसेलबद्दल बोलायचं झालं, तर तो टी20 विश्वचषक 2022मध्ये वेस्ट इंडिज संघाकडून खेळला नव्हता. तसेच, सुनील नारायण आणि शिमरॉन हेटमायर यांनाही संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याने ऑस्ट्रेलियाचे विमान सोडल्यानंतर त्याला स्पर्धेबाहेर केले होते. दोन वेळा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पात्रता फेरीतच स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. (west indies cricketer andre russell nude picture viral see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आमचे खेळाडू वयाने कमी असतील, पण…’, न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय कर्णधाराचे जबरदस्त वक्तव्य
कोण आहेत ‘ते’ 6 खेळाडू, ज्यांनी इंग्लंडला दोनदा बनवले वर्ल्डकप चॅम्पियन? एका क्लिकवर घ्या जाणून


Next Post
Virat-Kohli

व्हिडिओ एक, मूड्स अनेक! आयसीसीने दाखवली विराटची टी20 विश्वचषकातील प्रत्येक रिऍक्शन, एकदा पाहाच

Pat-Cummins-And-Cameron-Green

'त्याला मी रोखणार नाही, पण...', आयपीएल 2023मधून बाहेर पडणाऱ्या कमिन्सचे 'या' अष्टपैलूबद्दल वक्तव्य

indian team

"विदेशी लीग खेळायची काही गरज नाही"; टीम इंडियाच्या भविष्याविषयी दिग्गजाने‌‌ मांडले मत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143