Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आमचे खेळाडू वयाने कमी असतील, पण…’, न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय कर्णधाराचे जबरदस्त वक्तव्य

'आमचे खेळाडू वयाने कमी असतील, पण...', न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय कर्णधाराचे जबरदस्त वक्तव्य

November 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik-Pandya

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्या याच्या खांद्यावर आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती दिल्याने त्याच्या जागी पंड्या संघाची धुरा सांभाळणार आहे. त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर म्हटले की, भारतीय संघ मागील निकालांबद्दल विचार करण्यात विश्वास ठेवत नाही. 

हार्दिक पंड्याचे वक्तव्य
न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने भारतीय खेळाडूंबद्दल मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला की, “हे खेळाडू जरी वयाने युवा असतील, पण अनुभवाच्या बाबतीत बिल्कुल नाही. यांनी आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मला वाटते की, आजचे युवा खेळाडू जास्त क्रिकेट न खेळल्यामुळे घाबरत नाहीत.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “जर परिस्थितीची गरज असेल, तर मी आणि इतर अनुभवी खेळाडू वेगवेगळ्या भूमिका साकारू. मात्र, हा दौरा नवीन खेळाडूंसाठी अधिक स्पष्टता, संधी आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देण्यासाठी आहे.”

‘विश्वचषकाला सोडले मागे’
हार्दिक पंड्याने असेही म्हटले की, “विश्वचषक झाला आहे, मी त्याला मागेही सोडले आहे. निराशा असेल, पण आम्ही मागे जाऊन गोष्टी बदलू शकत नाही. आम्ही आता पुढील गोष्टींबद्दल आणि या मालिकेबद्दल विचार करत आहोत.”

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (दि. 18 नोव्हेंबर) खेळला जाणार होता. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. या मालिकेतील दुसरा सामना 20 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

टी20 विश्वचषकात भारतीय संघाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती. मात्र, उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या जागी भारताचा टी20 कर्णधार हार्दिक पंड्या याला बनवण्याची मागणी अनेक दिग्गजांनी केली. आता पंड्या भारताचा पूर्णवेळ टी20 कर्णधार होतो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ind vs nz skipper hardik pandya says many guys are young by age but not by experience team india)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण आहेत ‘ते’ 6 खेळाडू, ज्यांनी इंग्लंडला दोनदा बनवले वर्ल्डकप चॅम्पियन? एका क्लिकवर घ्या जाणून
‘मी सांगतो ना तो पुढच्या 10 वर्षात टी20 गाजवेल’, भारताच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी
तब्बल सहा वर्षांनी स्मिथने जुना फॉर्म मिळवला, नाबाद 80 धावा कुटल्यानंतर दिली खास प्रतिक्रिया


Next Post
Andre-Russell

आंद्रे रसेलने हद्दच केली पार! थेट मॉलमध्येच झाला NUDE, फोटो पाहिला का?

Virat-Kohli

व्हिडिओ एक, मूड्स अनेक! आयसीसीने दाखवली विराटची टी20 विश्वचषकातील प्रत्येक रिऍक्शन, एकदा पाहाच

Pat-Cummins-And-Cameron-Green

'त्याला मी रोखणार नाही, पण...', आयपीएल 2023मधून बाहेर पडणाऱ्या कमिन्सचे 'या' अष्टपैलूबद्दल वक्तव्य

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143