भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडने 10 विकेट्सच्या अंतराने पराभूत केले. या पराभवानंतर भारतीय संघाचा टी-20 विश्वचषकातील प्रवास संपला आणि संघावर सर्वत्र टीका होऊ लागल्या. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी देखील भारतावर सडकून टीका केली होती. आता त्यांच्या या प्रतिक्रियेवर हार्दिक पंड्याकडून प्रत्युत्तर आले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारतीय कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि दिग्गज विराट कोहली न्यूझीलंड दौऱ्यात संघासोबत नाहीत. अशात दौऱ्यात सुरुवातीला खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या कर्णधार असेल, तर एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करणार आहे. टी-20 विश्वचषकातील प्रदर्शनानंतर मायकल वॉन (Micheal Vaughan) भारतावर टीका करत अनेक मुद्दे बोलले होते. त्यांच्या मते भारतीय संघ क्षमता असूनही सर्वात निराशाजनक प्रदर्शन करणारा संघ आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला भविष्यातील नियमित कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. अशात हार्दिकने मायकल वॉन () यांच्या या टिकेला देखील प्रत्युत्तर देण्याचे काम केले आहे. हार्दिक म्हणाला की, “नक्कीच, जेव्हा तुम्ही चांगेल प्रदर्शन करत नाही, तेव्हा लोकांची मते तयार होत असतात, ज्याचा आम्ही सन्मान करतो. मला वाटते प्रत्येकाचे वेगळे मत असते. मला नाही वाटत की, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आम्हाला अजून काही सिद्ध करण्याची गरज आहे. हा एक खेळ आहे. तुम्हाला सतत सुधारणा करण्याची प्रयत्न करावे लागतात. शेवटी जो निकाल यायचा आहे, तो येणारच आहे. काही गोष्टी आहेत, ज्यांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. पुढे जात असताना आम्ही त्यावर काम करून आणि सुधारणा देखील करू.”
तत्पूर्वी मायकल वॉनने इंग्लंडकून भारताला मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, “भारताने 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी काय कामगिरी केली आहे. मर्यादित षटकांच्या इतिहासात क्षमता असून सर्वात खराब प्रदर्शन करणारा संघ भारत ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये ते ज्या पद्धतीने खेळत आहेत, ते म्हणजे हैराण करणारे आहे. भारताकडे चांगले खेळाडू आहेत, पण त्यांना योग्य पुढे घेऊन येण्याची योग्य प्रक्रिया मात्र त्यांच्याकडे नाहीये.” (Hardik Pandya responds to Michael Vaughan’s criticism)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टीव्ह स्मिथचा निवृत्ती घेण्याचा विचार? म्हणाला, ‘क्रिकेट बाकी आहे, मात्र शेवटही..’
टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्याची बादशाहत कायम! वर्ल्डकपमध्ये धावांचा रतीब घालूनसुद्धा विराट ‘या’ स्थानावर