टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघाने रिषभ पंत याला सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर बसवले होते. मात्र, जेव्हा दिनेश कार्तिक दुखापतीमुळे बाहेर पडला, तेव्हा पंतला ताफ्यात सामील केले होते. अशात विश्वचषकात जास्त संधी न मिळालेल्या पंतविषयी रॉबिन उथप्पा याने मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, जर पंतच्या फलंदाजी क्रमात बदल केला, तर तो आगामी काळात त्याच्या टी20 कारकीर्दीला पुन्हा जिवंत करू शकतो.
रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याचे असे मत आहे की, रिषभ पंत (Rishabh Pant) याला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी दिली पाहिजे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या टी20 संघात एन्ट्री झाल्यानंतर पंत आता यष्टीरक्षक म्हणून संघाची पहिली पसंती नाहीये. टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती.
माध्यमांशी बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, “रिषभ पंतने न्यूझीलंड मालिकेत डावाची सुरुवात केली पाहिजे. त्याने निश्चितरीत्या वरच्या फळीत फलंदाजी केली पाहिजे. मला वाटते की, टी20 क्रिकेटमध्ये तो आपले सर्वोत्तम प्रदर्शन देऊ शकतो आणि इथूनच तो पुढेही वाटचाल करेल.”
रिषभ पंत याच्या फलंदाजीत सातत्य नसल्यामुळे त्याला अनेकदा संघातून बाहेर बसावे लागले आहे. पंतने 2022मध्ये खेळलेल्या 22 टी20 सामन्यांमध्ये 30पेक्षाही कमी सरासरीने 337 धावा चोपल्या होत्या. मात्र, उथप्पाला विश्वास आहे की, आगामी 10 वर्षांमध्ये पंत टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा खेळाडू असेल.
पुढे बोलताना उथप्पा म्हणाला की, “तो मॅचविनर, गेमचेंजर आहे. तसेच, आपल्या फलंदाजीने एकट्याच्या दमावर सहजरीत्या भारताला सामना जिंकून देऊ शकतो. मला वाटते की, तो पुढील 10 वर्षांमध्ये टी20 क्रिकेटचा मोठा खेळाडू असेल.”
न्यूझीलंड दौऱ्यावर रिषभ पंत भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. अशात त्याला प्रत्येक सामना खेळण्याची संधी मिळेल. संघात यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन आणि संजू सॅमसन हे दोन पर्याय आहेत. मात्र, पंत असताना या दोन खेळाडूंपैकी एकाला फलंदाज म्हणून संघात स्थान मिळू शकते. पंतकडे संघात पुनरागमन करण्याची शानदार संधी आहे. आता न्यूझीलंड दौऱ्यात पंत काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Robin Uthappa On rishabh pant says he will be a huge player for india in t20 cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल सहा वर्षांनी स्मिथने जुना फॉर्म मिळवला, नाबाद 80 धावा कुटल्यानंतर दिली खास प्रतिक्रिया
NZvIND: पावसामुळे क्रिकेटसोडून ‘हा’ कोणता खेळ खेळू लागले दोन्ही संघाचे खेळाडू? पाहा व्हिडिओ