Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 विश्वचषकानंतर समोर आली नवी क्रमवारी; टीम इंडियाचे हे खेळाडू ‘अर्श’वर

November 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: Twitter/BCCI


मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषकाची समाप्ती झाली. अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद आपल्या‌ नावे केले. या संपूर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या जबरदस्त कामगिरीचा फायदा त्यांना नव्या आयसीसी टी20 क्रमवारीत झालेला दिसून आला.‌

गुरुवारी (17 नोव्हेंबर) आयसीसीने खेळाडूंची वैयक्तिक टी20 क्रमवारी जाहीर केली. फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने देखील क्रमवारीत 11 वे स्थान पटकावले. इंग्लंडला विजेतेपद मिळवून देणारे त्यांचे सलामीवीर ऍलेक्स हेल्स व कर्णधार जोस बटलर यांना देखील फायदा होत त्यांनी अनुक्रमे बारावा आणि तेरावा क्रमांक मिळवला. हेल्सने थेट 94 स्थानांची उडी घेत हे स्थान आपल्या नावे केले.‌ तर भारताचा हार्दिक पंड्या हा देखील 56 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीचा विचार केल्यास श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा, अफगाणिस्तानचा राशिद खान व इंग्लंडचा आदिल रशीद हे तीनही लेग स्पिनर पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार हा सर्वोच्च 14 व्या तर रविचंद्रन अश्विन 21 व्या क्रमांकावर काबीज आहे. टी20 विश्वचषकात भारतासाठी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने सर्वाधिक 10 बळी मिळवण्याची कामगिरी केली. या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याने थेट 22 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा कायम आहे. तर, न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला हार्दिक पंड्या या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचलाय. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलेला इंग्लंडचा बेन स्टोक्स हादेखील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत 56 व्या क्रमांकावर गेला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांना न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजापासून सावध राहावं लागणार! प्रत्येक 11 व्या चेंडूला घेतो विकेट
एमएस धोनीचा क्रिकेटनंतर टेनिस कोर्टवर जलवा, ‘या’ चॅम्पियनशिपमध्ये जिंकले दुहेरीचे विजेतेपद


Next Post
Zaheer Khan

भारतीयांनी विदेशी लीग खेळण्याची गरज आहे? वाचा जहीर खान काय म्हणाला

Jos Butler Comment on IPL To Cameron Green

VIDEO: 'मोठे ऑक्शन होणार आहे', जॉस बटलरने आयपीएल लिलावात अडकलेल्या 'या' ऑस्ट्रेलियन स्टारला केले स्लेज

Sky Stadium, Wellington

NZvIND | वेलिंग्टन टी20 पाण्यात! नाणेफेक न‌ होताच पहिला सामना रद्द

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143