भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले, पण उपांत्य सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ मागच्या काही काळापासून न्यूझीलंडवर भारी पडल्याचे दिसत आहे. परंतु यावेळी दोन्ही संघांमध्ये मोठे बदल दिसत आहेत. तसेच मागच्या वेळीपेक्षा परिस्थिती देखील वेगळी आहे. न्यूझीलंड संघात एक असा गोलंदाज आहे, ज्याच्यापासून भारतीयांना सर्वाधिक धोका असल्याचे पाहायला मिळते.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खेळला गेला होता. इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 73 धावांनी विजय मिळवला होता. आता जवळपास एक वर्षाच्या काळानंतर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ यापूर्वी आयर्लंडविरुद्ध खेळला होता आणि मालिकेतील सर्व सामने जिंकले होते. आता न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठीही हार्दिकच्या नेतृत्वातील संघ पूर्ण प्रयत्न करेल. हार्दिकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. अशात त्याला वैयक्तिक प्रदर्शन देखील चांगले करणे भाग आहे.
भारतासाठी हा गोलंदाज चिंतेचा विषय –
तसे पाहिले तर न्यूझीलंड संघ सध्या चांगले प्रदर्शन करत आहे आणि भारताला त्यांच्या प्रत्येक खेळाडूपासून सावध राहावे लागणार आहे. परंतु फिरकी गोलंदाज इश सोढी (Ish Sodhi) भारतासाठी सर्वात मोठी बाधा ठरू शकतो. सोठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकांमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. भारताविरुद्ध खेळलेल्या 15 डावांमध्ये त्याने 20 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 7.26 च्या इकोनॉमी रेटने धावा खर्च केल्या आहेत. तसेच त्याची सरासरी 19.25 राहिली आहे. सर्वात खास म्हणजे त्याने प्रत्येक 16 व्या चेंडूला विकेट घेतली आहे.
स्काय स्टेडियवर सोडीची जबरदस्त आकडेवारी –
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर सोढी विरोधी संघांसाठी अधिकच घातक ठरला आहे. याठिकाणी सर्वाधिक टी-20 विकेट्स त्याच्याच नावावर आहेत. स्काय स्टेडियमवर त्याने केळलेल्या आठ डावांमध्ये 14.76 च्या सरासरीने 8.09 च्या इकोनॉमी रेटने 17 विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही, या स्टेडियमवर त्याने प्रत्येक 11 व्या चेंडूवर विकेट मिळवली आहे.
टी-20 मालिकेसाठी निवडवेले दोन्ही संघ –
न्यूझीलंड –
केन विलियमसन (कप्तान), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी, ब्लेयर टिकनर.
भारत –
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक. (Team Indian have to be careful of ‘this’ bowler from New Zealand who Takes wicket at every 11th ball)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एमएस धोनीचा क्रिकेटनंतर टेनिस कोर्टवर जलवा, ‘या’ चॅम्पियनशिपमध्ये जिंकले दुहेरीचे विजेतेपद
राजस्थान रॉयल्सची झाली आहे चांदी, रीटेन केलेला ‘हा’ खेळाडू आहे भलत्याच फॉर्ममध्ये