Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीयांनी विदेशी लीग खेळण्याची गरज आहे? वाचा जहीर खान काय म्हणाला

भारतीयांनी विदेशी लीग खेळण्याची गरज आहे? वाचा जहीर खान काय म्हणाला

November 18, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Zaheer Khan

Photo Courtesy: Instagram/Zaheer Khan


आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताला उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर भारताचे टी-20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आणि संघावर जोरादार टीका देखील झाल्या. अनेकजण भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळत नसल्यामुळे त्यांना विदेशात खेळण्याचा अनुभव नसल्याचेही सांगत आहेत. अशात भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि सलामीवार ऍलेक्स हेल्स यांनी बीबीएलमधील त्यांच्या अनुभवाच्या जोरावर उपांत्य सामन्यात भारताला 10 विकेट्से पराभूत केले आहे. आयपीएलची सुरावत 2008 साली झाली, त्यानंतर बीसीएल, पाकिस्तान सुपर लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीग अशा विदेशी लीग सुरू झाल्या. आयपीएल खेळण्यासाठी येणाऱ्या विदेशी खेळाडूंचे बीसीसीआय स्वागत करत असते, पण विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी भारतीयांना मात्र परवानगी देत नाही. अनेकांच्या मते बीसीसीआयच्या या निर्णयामुळेच भारतीय संघाला टी-20 विश्वचषकात तोटा सोसावा लागला आहे. मात्र, झहीर खान (Zaheer Khan) याच्या मते प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते आणि बीसीसीआय ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पाडत आहे.

विदेशी लागमध्ये भारतीय खेळाडूंना खेळण्याविषयी झहीर खान म्हणाला की, “मला वाटते यासाठी खूप प्रक्रिया आहेत. हे केवळ फ्रेंचायझी क्रिकेट खेळण्याविषयी नाहीये, हे वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन गोष्टी शिकण्याविषयी आहे. हे महत्वाचे आहे आणि बीसीसीआय कोणताही दौरा करताना ही प्रक्रिया आमलात आणते. त्यामुळे मला कोणतेच कारण दिसत नाही, ज्यासाठी भारतीय खेळाडूंनी विदेशी लीग खेळल्या पाहिजे”

भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिक याच्याकडूनही झहीर खानला खूप अपेक्षा आहेत. झहीरच्या मते न्यूझीलंड दौरा उमरानसाठी फायदेशीर ठरू शकतो. तो म्हणाला, “उमरान एक कमालीचा प्रतिभाशाली गोलंदाज आहे आणि अशा प्रकारचे प्रदर्शन भविष्यात त्याच्या फायद्याचे ठरेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने जागा पक्की केली, तर ही निवड महत्वाची ठरणार आहे.” (Zaheer Khan said no need for indians to play in foreign t20 leagues)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकानंतर समोर आली नवी क्रमवारी; टीम इंडियाचे हे खेळाडू ‘अर्श’वर
प्रीमियर लीगसह FSDLची भागीदारी भारतीय फुटबॉलमध्ये भरीव सुधारणा करू शकते – प्रीमियर लीगचा दिग्गज खेळाडू पॉल डिकोव्ह  


Next Post
Jos Butler Comment on IPL To Cameron Green

VIDEO: 'मोठे ऑक्शन होणार आहे', जॉस बटलरने आयपीएल लिलावात अडकलेल्या 'या' ऑस्ट्रेलियन स्टारला केले स्लेज

Sky Stadium, Wellington

NZvIND | वेलिंग्टन टी20 पाण्यात! नाणेफेक न‌ होताच पहिला सामना रद्द

Yuzvendra Chahal & Sanju Samson & Ish Sodhi

NZvIND: पावसामुळे क्रिकेटसोडून 'हा' कोणता खेळ खेळू लागले दोन्ही संघाचे खेळाडू? पाहा व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143