Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल सहा वर्षांनी स्मिथने जुना फॉर्म मिळवला, नाबाद 80 धावा कुटल्यानंतर दिली खास प्रतिक्रिया

तब्बल सहा वर्षांनी स्मिथने जुना फॉर्म मिळवला, नाबाद 80 धावा कुटल्यानंतर दिली खास प्रतिक्रिया

November 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Steven Smith Jos Buttler

Photo Courtesy: Twitter/CricketAus


ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथ गुरुवारी (17 नोव्हेंबर) त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये फलंदाजी करताना दिसला. मागच्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार अपेक्षित प्रदर्शन करत नव्हता. पण गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 80 धावा कुटल्या. या महत्वपूर्व खेळीच्या जोरावर त्याने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. विजयानंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया महत्वाची ठरली. 

स्टीव स्मिथ (Steve Smith) सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने सांगितल्यानुसार मागच्या सहा वर्षातील ही त्याची सर्वोत चांगली खेळी होती. तो म्हणाला, “शक्यतो मागच्या सहा वर्षांमध्ये ही माझी सर्वोत्तम खेळी होती. मी चांगल्या फॉर्ममध्ये होतो. खरं सांगायचं झाल्यास मागच्या सहा वर्षात फलंदाजी करताना असे कधीच जाणवले नव्हते. अशा सामन्यांमध्ये संघासाठी काही धावा करणे नेहमीच खास असते. मी नेहमीच परिपूर्ण बनण्याच्या प्रयत्नात असतो. मला वाटते या सामन्यातील खेळी परिपूर्णतेच्या जवळ होती.”

स्मिथ या सामन्यात एकूण 78 चेंडू खेळला, ज्यामध्ये 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 80 धावा कुटल्या. स्मिथने दिलेल्या माहितीनुसार मागच्या जवळपास 12 महिन्यांच्या काळात त्याने स्वतःची शैली सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो म्हणाला की, “मी काही गोष्टींवर काम करत आहे. ही जवळपास 6 किंवा 12 महिन्यांची प्रक्रिया आहे. मागच्या हंगामापासून मी माझ्या हातांना त्यांच्या जुन्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे, जसे ते 2015 मध्ये होते. मला वाटते की आता माझे पाय आणि हातांमध्ये समतोल साधला गेला आहे. आशा आहे की, ही एका चांगल्या हंगामाची सुरुवात असेल.”

दरम्यान, एकदिवसीय मालिकेच्या आधी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळला गेला. मायदेशात खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे प्रदर्शन मात्र निराशाजनक राहिले. त्यांचा संघ उपांत्य फेरीत देखील जागा मिळवू शकला नाही. विश्वचषक स्पर्धेत स्टीव स्मित बहुतांश वेळा प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसलेला दिसला. त्याने विश्वचषकातील पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात त्याने चार धावा करून विकेट गमावली होती. (After almost six years, Smith regained his old form, giving a special reaction after hitting 80 not out)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- न्यूझीलंड सामन्यादरम्यान भडकले समालोचक, सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाण्याऱ्या देशातच मिळाली घाणेरडी सेवा
जवळपास ठरलचं! रोहितला हटवण्यावर निवड समितीचे झाले एकमत; या दिवशी होणार अधिकृत घोषणा 


Next Post
Rishabh-Pant-And-MS-Dhoni

'मी सांगतो ना तो पुढच्या 10 वर्षात टी20 गाजवेल', भारताच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Kane Williamson & Hardik Pandya

VIDEO: टी20 विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी सामना? विल्यमसन उत्तरला, 'हार्दिक तुला काय...'

2007 T20 Worldcup Team India

मोठी बातमी! टी20 विश्वचषक 2007च्या विजयावर बनणार वेब सीरिज, दिसणार 15 भारतीय खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143