Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत- न्यूझीलंड सामन्यादरम्यान भडकले समालोचक, सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाण्याऱ्या देशातच मिळाली घाणेरडी सेवा

भारत- न्यूझीलंड सामन्यादरम्यान भडकले समालोचक, सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाण्याऱ्या देशातच मिळाली घाणेरडी सेवा

November 18, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Simon-Doull

Photo Courtesy: Twitter/ICC & Sdoull


भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात टी20 सामन्याने होणार होती. हा सामना शुक्रवारी (दि. 18 नोव्हेंबर) वेलिंग्टन येथे खेळला जाणार होता. मात्र, पावसाने मध्येच रोडा घातला आणि हा सामना रद्द करावा लागला. यादरम्यान समालोचक आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डोल हे भलतेच नाराज झाले. सायमन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत आपला राग व्यक्त केला.

काय म्हणाले सायमन डोल?
झाले असे की, भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात पहिला टी20 सामना रद्द झाला. मात्र, समालोचनासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये गेले असताना सायमन डोल (Simon Doull) यांना तेथील खुर्च्या धुळीत असल्याचे दिसले. यामुळे त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. यामध्ये ते कॉमेंट्री बॉक्समधील घाणेरड्या खुर्च्या दाखवत होते.

त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “इथे खेळण्याचे आणखी एक चांगले कारण आहे. मी आताच कॉमेंट्री बॉक्समधील सर्व खुर्च्या स्वत: साफ केल्या, जेणेकरून आमचे परदेशी पाहुणे बसू शकतील. किती वाईट जागा आहे, लज्जास्पद, न्यूझीलंडमध्ये स्वागत आहे.”

⁦@Sportsfreakconz⁩ ⁦@martindevlinnz⁩ Another great reason to play here at ⁦@skystadium⁩ . I have just cleaned all the seats in our commentary area so our overseas guests can sit down. What a shambles of a place. Embarrassing. #welcometoNZ pic.twitter.com/Xnpz5BihcI

— Simon Doull (@Sdoull) November 18, 2022

खरं तर, असे नेहमी होते की, खराब व्यवस्थेमुळे माजी क्रिकेटपटू किंवा प्रेक्षक नाराज होतात. मात्र, न्यूझीलंडसारख्या देशात, जे आपल्या सुव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्याकडून अशी व्यवस्था मिळणे हे प्रत्येकासाठीच हैराण करणारी गोष्ट आहे.

पहिल्या सामन्यासाठीची उभय संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ-
शुबमन गिल, ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ-
फिन ऍलेन, डेवॉन कॉनवे, केन विलियम्सन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेयर टिकनर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
NZvIND: पावसामुळे क्रिकेटसोडून ‘हा’ कोणता खेळ खेळू लागले दोन्ही संघाचे खेळाडू? पाहा व्हिडिओ
NZvIND | वेलिंग्टन टी20 पाण्यात! नाणेफेक न‌ होताच पहिला सामना रद्द


Next Post
New Zealand Cricket & Trent Boult

न्यूझीलंडची साथ सोडलेल्या बोल्टबद्दल हे काय म्हणाला साथीदार साऊदी?

Steven Smith Jos Buttler

तब्बल सहा वर्षांनी स्मिथने जुना फॉर्म मिळवला, नाबाद 80 धावा कुटल्यानंतर दिली खास प्रतिक्रिया

Rishabh-Pant-And-MS-Dhoni

'मी सांगतो ना तो पुढच्या 10 वर्षात टी20 गाजवेल', भारताच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143