Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वॉर्नर आणि त्याचा गोंडस चाहता सोशल मीडियावर व्हायरल, मार्नस लाबुशेनकडे केली ‘ही’ मागणी

वॉर्नर आणि त्याचा गोंडस चाहता सोशल मीडियावर व्हायरल, मार्नस लाबुशेनकडे केली 'ही' मागणी

November 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
david warner

Photo Courtesy-Twitter/cricketcomau/Screengrabs


ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. वॉर्नत त्याच्या अधिकृत सोशल मीडियाव खात्यावरून चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे, जो क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला आहे. व्हिडिओ वॉर्नर आणि त्याचा एक छोटा चाहता पोस्टरच्या माध्यमातून चर्चा साधताना दिसतात.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना गुरुवारी (17 नोव्हेबंर) एडिलेड ओव्हलवर खेळला गेला. डेविड वॉर्नर (David Warner) या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने संघासाठी 86 धावांची खेळी करून चांगली सुरुवात दिली. विकेट गमावल्यानंतर जेव्हा वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये आला. यावेळी त्याचा एक छोटा चाहता स्क्रीनवर दिसत होता आणि त्याते हातात एक पोस्टर देखील पकडला होता. या पोस्टरवर चाहत्याने लिखीत स्परूपात वॉर्नरकडे त्याचा शर्ट मागितला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद होत होता आणि वॉर्नरने देखील हे सर्व पाहिले.

काही वेळ झाल्यानंतर वॉर्नरने देखील पोस्टवर एक संदेश लिहिला आणि चाहत्याला प्रत्युत्तर दिले. वॉर्नरने त्याच्या पोस्टरवर चाहत्यासाठी “मार्नस लाबुशेन  (Marnus Labuschagne) याला शर्ट माग”, असे लिहिले होते. वॉर्नरकडून हा संदेश मिळाल्यानंतर काही वेळातच हा चाहता लाबुशेनकडे शर्टची मागणी करू लागला. यावेळी वॉर्नर त्या चाहत्याला ड्रेसिंग रूमकडे बोलवताना देखील दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

What a rollercoaster! #AUSvENG @davidwarner31 @marnus3cricket pic.twitter.com/gFnke3Gctw

— cricket.com.au (@cricketcomau) November 17, 2022

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (17 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना कमी पडल्याचे दिसले. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीसाठी इंग्लंडला आमंत्रित केले. 50 षटकांच्या या सामन्यात इंग्लंड 9 विकेट्सच्या नुकसानावर 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 46.5 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात वॉर्नरने 86, ट्रेविस हेड याने 69, तर स्टीव स्मिथ याने नाबाद 80 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी देखील जबरदस्त होती. पॅट कमिन्स आणि ऍडम झंपा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.  (A beautiful video of David Warner and his fan is going viral on social media)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
NZvIND: पावसामुळे क्रिकेटसोडून ‘हा’ कोणता खेळ खेळू लागले दोन्ही संघाचे खेळाडू? पाहा व्हिडिओ
मैदानावर स्टीव्ह स्मिथचे डेविड वॉर्नरसाठी ‘ते’ दोन बोल, व्हिडिओ होतोयं जबरदस्त व्हायरल  


Next Post
Simon-Doull

भारत- न्यूझीलंड सामन्यादरम्यान भडकले समालोचक, सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाण्याऱ्या देशातच मिळाली घाणेरडी सेवा

New Zealand Cricket & Trent Boult

न्यूझीलंडची साथ सोडलेल्या बोल्टबद्दल हे काय म्हणाला साथीदार साऊदी?

Steven Smith Jos Buttler

तब्बल सहा वर्षांनी स्मिथने जुना फॉर्म मिळवला, नाबाद 80 धावा कुटल्यानंतर दिली खास प्रतिक्रिया

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143