टी-20 विश्वचषक 2022 जिंकल्यानंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत केल्यानंतर इंग्लंड इतिहासात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता बनला. त्यानंतर संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे, ज्यातील पहिल्या सामन्यात इंग्लंड 6 विकेट्से पारभूत झाला.
ऑस्ट्रेलिया संघासाठी हा विजय सोपा ठरला. इंग्लंडने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) आणि फिल सॉल्ट (Phil Salt) इंग्लंडला अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाहीत. या दोघांनी अनुक्रमे 6 आणि 14 धावा करून विकेट गमावली. मात्र, त्यानंतर फलंदाजीला आलेला डेविड मलान (Dawid Malan) मात्र संघासाठी सर्वात मोठी खेळी करू शकला. मलानने 128 चेंडूत 134 धावा कुटल्या.
सलामीवीर फलंदाज अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडने या सामन्यात 50 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियात 46.5 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावा करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी त्यांचे सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी अनुक्रमे 86 आणि 69 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला स्टीव स्मिथ शेवटपर्यंत नाबाद राहिला. स्मिथने नाबाद 80 धावा कुटल्या.
इंग्लंडच्या पराभवाचे कारण ठरले, पावरप्लेमध्ये त्यांच्या फलंदाजांचे सुमार प्रदर्शन. इंग्लंडने पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट घेण्यासाठी इंग्लिश गोलंदाजांना 20 व्या षटकाची वाट पाहावी लागली. ऑस्ट्रेलियाचा वेगावन गोलंदाज पॅट कमिन्स आणि ऍडम झंपा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्से पराभव स्वीकारला आहे. पॅट कमिन्सने या विकेट्स 62 धावा खर्च करून तर झंपाने 55 धावा खर्च करून या विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे इंग्लंडसाठी डेविड विले याने 8 षटकांमध्ये 51 धावा खर्च करून सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. (England had to accept defeat in the first ODI match against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूला डावलणे सीएसकेला महागात पडणार! विजय हजारे ट्रॉफीत कुटले सलग तिसरे शतक
उत्तराखंडमधील नीब करोरी बाबाच्या दर्शनाला पोहोचला विराट, चाहत्यांसोबतचे फोटो व्हायरल