Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर‌ अमेरिकेतील टी20 लीगला सापडला मुहूर्त; शाहरुखच्या नाईट रायडर्ससह हे संघ मैदानात

November 17, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/MLC

Photo Courtesy: Twitter/MLC


मागील जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने पुढे ढकलल्या जात असलेल्या अमेरिकेतील टी20 लीगला अखेर मुहूर्त सापडला आहे. मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) नावाची ही स्पर्धा आता पुढील वर्षी जुलै महिन्यात खेळली जाईल. याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच आयोजकांनी जाहीर केली. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील.

Cricket is about to get REAL in the USA 🇺🇸 🎉 🙌

Mark your calendars because the #MLC2023 inaugural season dates have officially dropped 🎤 ⬇️

🏏 𝕁𝕌𝕃𝕐 𝟙𝟛-𝟛𝟘, 𝟚𝟘𝟚𝟛 🏏

Read more ➡️ https://t.co/Wo9RbOUbjO pic.twitter.com/jilqsdwpiV

— Major League Cricket (@MLCricket) November 15, 2022

 

मंगळवारी या स्पर्धेचे अधिकृत घोषणा करताना सांगण्यात आले की,

‘या बहुप्रतिक्षित स्पर्धेची सुरुवात पुढील वर्षी 13 जून रोजी होईल. अमेरिकन क्रिकेटमध्ये क्रांती करणाऱ्या स्पर्धेमध्ये जगातील अनेक अव्वल क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.’

मेजर लीग क्रिकेटचा उद्घाटनाचा सामना टेक्सास येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रँड प्रेयरी स्टेडियम येथे होईल. 18 दिवस चालणारी ही स्पर्धा 6 संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने खेळली जाईल.

या स्पर्धेमध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची मालकी असलेल्या अभिनेता शाहरुख खान याने लॉस एंजेलिस नाईट रायडर्स नावाचा संघ खरेदी केला आहे. तर इतर पाच संघ अनुक्रमे डेल्लास, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, सिएटल व न्यूयॉर्क या शहरांचे असतील. काही आयपीएल फ्रॅंचाईजी या लीगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

सध्या अमेरिकेत हळूहळू क्रिकेट प्रसिद्ध होत आहे. भारतीय उपखंडातील लोकांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, आयसीसी देखील अमेरिकेत क्रिकेटचा प्रचार करण्यावर भर देतेय. त्याचाच एक भाग म्हणून 2024 च्या टी20 विश्वचषकाचे सह आयोजक म्हणून अमेरिकेला संधी दिली गेली आहे. सध्या अमेरिकेचा क्रिकेट संघ सदस्य असून, त्या विश्वचषकात यजमान म्हणून त्यांना थेट पात्रता फेरीत उतरण्याची संधी मिळेल.

(American T20 League Major League Cricket Starts Next Year)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर मुहूर्त सापडला! दिल्लीमध्ये पाच वर्षांनंतर खेळला जाणार कसोटी सामना

‘आयपीएलला बॅगा भरून पळाला असता’; मोईन अलीला क्लार्कने झापले 

भारतीय दिग्गज म्हणतोय, ‘ऋतुराज सीएसकेचा पुढील कर्णधार व्हावा’ 


Next Post
mitchell starc

जबरदस्त! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनेडत मिचेल स्टार्कने दाखवला इनस्विंगचा दम, जेसन रॉय क्लीन बोल्ड

Photo Courtesy: Twitter/BCCI Domestic

टीम इंडियातून डावललेल्या राहुल त्रिपाठीची निवडकर्त्यांना सणसणीत चपराक! महाराष्ट्रासाठी केली 156 धावांची वादळी खेळी

UAE vs Nepal

यूएईच्या गोलंदाजाने केले असे काही कृत्य, ज्यामुळे नेपाळ संघाला मिळाल्या फुकटच्या 5 धावा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143