ऑस्ट्रेलियन संघ पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या या दौऱ्यात त्यांना भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यादरम्यान एक सामना दिल्लीमध्ये खेळला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दिल्लीमध्ये एखाद्या कसोटी सामन्याचे आयोजन केले जाणार असल्यामुळे या सामन्याला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ही मालिका चार सामन्यांची असून त्यांतील एक सामना दिल्ली खेळला जाईल. राहिलेले तीन सामने अहमदाबाद, धर्मशाला आणि चेन्नई याठिकाणी खेळले जाण्याची पूर्ण शक्यता सांगितली गेली आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामातील भारताचे हे शेवटचे चार कसोटी सामने असतील. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला ही मालिका 4-0 अशा अंतराने जिंकवी लागणार आहे. मात्र, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देईलच याची खूप कमी शक्यता आहे.
दिल्लीमध्ये 2017 मध्ये खेळला गेला होता शेवटचा कसोटी सामना –
बीसीसीआय रोटेशन फॉर्मूल्यानुसार दिल्लीमध्ये यावेळी कसोटी सामना होणे निश्चित आहे. याठिकाणी शेवटचा कसोटी सामना 2017 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. बीबीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ओळख लपवण्याच्या अटीवर याविषयी महत्वाची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिल्लीला चार कसोटी सामन्यांपैकी दुसऱ्या कसोटी सामन्याची जबाबदारी मिळू शकते. दौऱ्याचा एकूण कार्यक्रम समितीच्या बैठकीनंतर सामन्याचा कार्यक्रम समोर येईल. धर्मशालामध्ये मालिकेतील तिसरा सामना खेळला जाऊ शकतो, ज्याठिकाणी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळला गेला होता.”
चेन्नई किंवा हैदराबादमधून ऑस्ट्रेलिया करणार दौऱ्याची सुरुवात –
ऑस्ट्रेलियन संघाचा हा दौरा चेन्नई किंवा हैदराबाद याठिकाणी सुरू होऊ शकतो. कारण यावर्षीच्या सुरुवातील बेंगलोरमध्ये श्रीलंकेविरुद्धचा कसोटी सामना खेळला गेला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाऊ शकतो. तसेच या चार कसोटी सामन्यांपैकी कोणता सामना दिवस रात्र स्वरूपात खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धोनीमुळे भारतीय संघाची ताकत वाढेल’, माहीचे पाकिस्तानी दिग्गजाकडून गुणगान
न्यूझीलंड दौऱ्यावर ‘हा’ खेळाडू असणार सलामीवीर, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये