भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर काही वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला असून युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यामुळे या युवा खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यावर आपली छाप सोडण्याची संधी आहे. भारतीय संघाला या दौऱ्यावर 3 टी20 सामने आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. हा दौरा शुभमन गिल याच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याने न्यूझीलंडमध्येच आपल्या एकदिवसीय कारकीर्दीचा सुरुवात केली होती. मात्र, ती सुरूवात चांगली नव्हती.
न्यूझीलंडचा दौरा भारतासाठी बऱ्याच बाबतीत महत्वपूर्ण मानला जात आहे. टी20 विश्वचषकात मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघाच्या पुनर्बांधनीच्या चर्चांना उधान आले आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे दिले असून त्याच्या सोबत युवी खेळाडूंची फौज आहे. मात्र, संघात कोणताही नियमित सलामीवीर उपलब्ध नाही. त्यामुळे शुभमन गिल (Shubman Gill) याच्यासोबत ईशान किशन (Ishan Kishan) किंवा संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्यापैकी एक सलामीवीराच्या रुपात असणार आहे. गिलवर सर्वांचे लक्ष असणार आहे, कारण त्याने मागच्या काही एकदिवसीय सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे.
2019मध्ये जेव्हा भारतीय संघ न्यूझालंड दौऱ्यावर आलेला तेव्हा शुभमन गिल याने येथे एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात मिळाली. गिल पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 9 धावा करु शकला. त्यानंतर वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या 7 धावा करत तंबूत परतला. हा दौरा त्याच्यासाठी एका वाईट स्वप्नासारखा होता.
गिलचा सध्याचा फॉर्म धमाकेदार
सलामीवीराच्या रुपात गिलने शानदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याने 64,43 आणि 98 धावांची नाबाद खेळी केली होती. या सामन्यात तो पावसाच्या व्यत्ययामुळे शतक बनवण्यापासून हुकला. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर 82,33 आणि 130 धावांची खेेळी केली. हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते.(Shubman Gill will be the opener on New Zealand Tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ खेळाडू आयपीएल 2023मध्ये खोऱ्यानं ओढणार पैसा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी
‘न्यूझीलंड दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी द्या’, बलाढ्य संघाच्या माजी दिग्गजाकडून अर्शदीपचे कौतुक