टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला मिळालेल्या पराभवानंतर अनेकजण एमएस धोनी याची आठवण काढत आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक, तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. काही दिवासांपासून धोनी संघात मेंटॉर म्हणून पुनरागमन करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सलमान बट याने स्वतःचे मत व्यक्त केले आहे. धोनी जर भारतीय संघासोबत पुन्हा जोडला गेला, तर संघासाठी ही खूपच फायद्याची गोष्ट असेल.
एमएस धोनी (MS Dhoni) याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केले होती. त्यानंतर भारतीय संघाला नेहमीच त्याची कमी जाणवत आली आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 साली खेळला गेलेला पहिला टी-20 विश्वचषक, तर 2011 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. 2013 मध्ये धोनीने भआरताला शेवटची आयसीसी ट्रॉफी म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली. भारताला या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा धोनी पुन्हा एकदा संघाच्या मेंटॉरच्या रूपात पुनरागमन करणार असल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये आहेत. चाहत्यांमध्ये या बातम्यांमुळे उत्साहाचे वातावरण आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट () देखील धोनीला पुन्हा एकदा भरतीय संघात सहभागी झाल्याचे पाहण्यासाठी उत्सुक दिसत आहे.
सलमान बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “धोनी आल्यानंतर भारतीय संघाला खूप फायदा मिळेल. तो ज्या पद्धतीचा कर्णधार राहिला आहे, त्याची रणनीती आणि स्वभाव संघासाठी शस्त्रासारखा काम करेल. त्याच्या डोक्याचा खेळाडूंनाही फायदा होईल. भारतीय क्रिकेट खूप पुढे जाईल. तुम्ही अनुभवाला हरवू शकत नाही.”
दरम्यान, भारतीय संघ टी-20 विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. पण उपांत्य सामन्यात इंग्लडने भारताला तब्बल 10 विकेट्सने पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताच्या प्रदर्शनावर चाहते आणि जाणकार चांगलेच नाराज दिसतात. अनेकजण रोहितच्या नेतृत्वावर तर अनेकजण गोलंदाजांच्या प्रदर्शनावर टीका करत आहेत. (Former Pakistan captain Salman Butt said the team will benefit from Dhoni’s inclusion in the Indian team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड दौऱ्यावर ‘हा’ खेळाडू असणार सलामीवीर, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये
‘तू खरा मुस्लीम नाही म्हणूनच…’, माजी दिग्गजाची मोहम्मद रिजवानवर घणाघाती टीका