“आमचे खेळाडू देशापेक्षा पैशाला महत्त्व देऊ लागलेत”; कॅरेबियन दिग्गज झाला भावूक

एकवेळ क्रिकेट जगतावर हुकूमत असणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे सध्या पतन झाले आहे. प्रत्येकी दोन वेळा वनडे व टी20 विश्वचषक जिंकणारा हा संघ नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतूनच बाहेर पडलेला. वेस्ट इंडीज क्रिकेटला लागलेल्या या उतरत्या कळेबाबत वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याने दुःख व्यक्त केले आहे.
दोन वेळा टी20 विश्वचषक उंचावलेल्या वेस्ट इंडीज संघाला यंदा टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीतही प्रवेश करता आला नाही. आयर्लंड व स्कॉटलंड या संघांनी त्यांना पराभूत केल्याने त्यांचा प्रवास पात्रता फेरीत संपुष्टात आला. त्यामुळे अनेक जण त्यांच्या संघावर टीका करताना दिसतायेत. याच दरम्यान संघाचा माजी कर्णधार शिवनारायण चंद्रपॉल याने, संघाच्या खराब कामगिरीचे विश्लेषण करताना काही कारणे दिली.
ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राशी बोलताना तो म्हणाला,
“सध्या जगभरात अनेक व्यावसायिक टी20 लीग खेळल्या जातात. वेस्ट इंडीज क्रिकेट आता त्या स्थितीत नाही, ज्यावर आमची खेळाडू निर्भर राहू शकतात. त्यामुळे त्यांचा कल या लीगकडे वाढला आहे. अधिकचा पैसा व प्रसिद्धी यामुळेच ते देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा लीग खेळण्याला प्राधान्य देताना दिसतायेत. याच कारणांमुळे खेळाडूंची कारकीर्द देखील मोठी होताना दिसत नाही.”
तो पुढे म्हणाला,
“आमच्या वेळी आम्ही देशासाठी खेळत होतो. मला व माझ्या सहकाऱ्यांना पैशापेक्षा अंगावर असलेली देशाची जर्सी महत्त्वाची होती.”
तब्बल वीस वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपाल याने वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून वीस हजारांपेक्षा जास्त धावांचा डोंगर रचलेला.
(Shivnarine Chanderpaul says our players more interested in money as compared playing for west Indies)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर मुहूर्त सापडला! दिल्लीमध्ये पाच वर्षांनंतर खेळला जाणार कसोटी सामना
‘आयपीएलला बॅगा भरून पळाला असता’; मोईन अलीला क्लार्कने झापले
भारतीय दिग्गज म्हणतोय, ‘ऋतुराज सीएसकेचा पुढील कर्णधार व्हावा’