आयपीएल 2023 साठी सर्व फ्रॅंचायजींनी आपल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाने देखील सर्वाधिक 18 खेळाडूंना या पुढील हंगामासाठी आपल्या संघात कायम ठेवलेय. त्याचवेळी संघाचा कर्णधार एमएस धोनी हा आपला अखेरचा आयपीएल हंगाम खेळणार असल्याचे देखील निश्चित झाले आहे. त्यामुळे या हंगामानंतर चेन्नईचा पुढील कर्णधार कोण याबाबतही चर्चा होतेय. त्याचवेळी भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर याने सीएसकेचा पुढील कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड याचे नाव घेतले आहे.
एमएस धोनी याने तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो अजूनही आयपीएलमध्ये खेळतोय. परंतु, आयपीएल 2023 नंतर तो आयपीएललाही रामराम ठोकणार असल्याचे नक्की झाले आहे. त्याच्यानंतर सीएसकेचा कर्णधार कोण व्हावा याबाबत विचारले असता जाफर म्हणाला,
“मला वाटते की सीएसकेचा पुढील कर्णधार म्हणून ऋतुराजच्या नावाचा विचार होऊ शकतो. कॉनवेसह तो संघाचा प्रमुख खेळाडू राहील. तो अजूनही तरुण आहे आणि नेतृत्व देखील करू शकतो. तो महाराष्ट्राचे देखील नेतृत्व भूषवतो. त्यामुळे सीएसके संघ व्यवस्थापन त्याच्या नावाचा नक्कीच विचार करेल. एमएसच्या डोक्यात आणखी देखील काही नावे असू शकतात.”
धोनी हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सीएसकेचा कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने 4 आयपीएल विजेतेपदे पटकावली असून, तब्बल सात वेळा त्यांनी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. मागील हंगामात धोनीने नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे दिलेली. मात्र, त्याच्या नेतृत्वात संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अखेरच्या काही सामन्यांमध्ये पुन्हा धोनी याने संघाचे नेतृत्व केले. दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हा मागील तीन हंगामापासून चेन्नईचा प्रमुख खेळाडू आहे. 2021 मध्ये त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावलेली. मात्र, यावर्षी त्याला तितकी उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
(Ruturaj Gaikwad Will CSK Next Captain Jaffer Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर मुहूर्त सापडला! दिल्लीमध्ये पाच वर्षांनंतर खेळला जाणार कसोटी सामना
‘धोनीमुळे भारतीय संघाची ताकत वाढेल’, माहीचे पाकिस्तानी दिग्गजाकडून गुणगान