---Advertisement---

जबरदस्त! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनेडत मिचेल स्टार्कने दाखवला इनस्विंगचा दम, जेसन रॉय क्लीन बोल्ड

mitchell starc
---Advertisement---

टी-20 विश्वचषक संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात इंग्लंडसोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली होती. इंग्लंडने टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांचा मायदेशात 2-0 अशी मात दिली होती. त्यानंतर इंग्लंडने टी-20 विश्वचषक जिंकला आणि आता एकदिवसीय मालिकेसाठी संघ सज्ज आहे. एकदिवसीय मालिकेच्या पिहल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. 

इंग्लंडंचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) स्टार्कच्या एका जबरदस्त इनस्विंग चेंडूचा शिकार झाला. मिचेल स्टार (Mitchell Starc) त्याच्या घातक इनस्विंग चेंडूसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 नोव्हेंबर रोजी एडिलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात स्टार्कने पुन्हा एकदा त्याच्या इनस्विंगची कमाल दाखवून दिली. चेंडू एवढा वेगवान होता की, जेसन रॉयला विकेट जाईपर्यंत काहीच समजेले नाही, असेच दिसले. हा चेंडू खेळताना रॉयचे संतुलन बिघडले आणि तितक्यात चेंडू थेट स्टंप्समध्ये घुसला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून स्टार्कने टाकलेला हा घातक चेंडू सर्वासोबत शेअर केला आहे.

https://twitter.com/cricketcomau/status/1593089151112335360?s=20&t=2uVVBDItDx6fZk6K_K7Akw

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर इंग्लंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जेसन रॉय अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला. या धावा करण्यासाठी त्याला 11 चेंडू खेळावे लागले. तसेच इंग्लंडचा दुसरा सलामीवीर फिल सॉल्ट देखील 15 चेंडूत अवघ्या 14 धावा करून बाद झाला.  उभय संघांतील हा सामना त्याच मैदानावर खेळला जात आहे, ज्याठिकाणी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्या सामन्यात इंग्लंडने भारताला पराभूत केले होते. भारताला या उपांत्य सामन्यात तब्बल 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. अंतिम सामन्यात इंग्लंडचा सामना पाकिस्तानसोबत झाला आणि हा सामना देखील इंग्लनडे पाच विकेट्सच्या अंतराने जिंकला. दरम्यान, ही दुसरी वेळ आहे, जेव्हा इंग्लंड टी-20 विश्वचषकाचा विजेता बनला आहे. (Mitchell Starc clean bowled Jason Roy with a powerful inswing delivery)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आमचे खेळाडू देशापेक्षा पैशाला महत्त्व देऊ लागलेत”; कॅरेबियन दिग्गज झाला भावूक
‘न्यूझीलंड दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी द्या’, बलाढ्य संघाच्या माजी दिग्गजाकडून अर्शदीपचे कौतुक  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---