---Advertisement---

टीम इंडियातून डावललेल्या राहुल त्रिपाठीची निवडकर्त्यांना सणसणीत चपराक! महाराष्ट्रासाठी केली 156 धावांची वादळी खेळी

---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी 2022-2023 सध्या देशभरात विविध शहरात खेळला जात आहे. गुरुवारी (17 नोव्हेंबर) या स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबईचे संघ आमने-सामने आले. या दोन तुल्यबळ संघातील सामन्यात महाराष्ट्राच्या फलंदाजांनी ‌‌ तुफानी फलंदाजी करत मुंबईविरुद्ध धावांचा डोंगर उभारला. महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज राहुल त्रिपाठी याने वादळी दीडशतकी खेळी करत भारतीय संघाच्या निवड समितीला सणसणीत चपराक दिली.

 

रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघ आपला नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला. मात्र, संघाचा अनुभवी फलंदाज राहुल त्रिपाठी याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शानदार खेळ दाखवला. ऋतुराजच्या जागी संधी मिळालेल्या युवा पवन शहा याच्यासह त्याने तब्बल 180 धावांची दणदणीत सलामी दिली. शहाने 84 भावांचे योगदान दिले. दुसरीकडे त्रिपाठीने 109 चेंडूंवर आपले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 137 चेंडूंवर 18 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 156 धावांची खेळी केली. या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने मुंबईसमोर विजयासाठी 343 धावांचे मोठे लक्ष ठेवले.

राहुल त्रिपाठी हा जून महिन्यापासून सातत्याने भारतीय संघासोबत होता. आयर्लंड, वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे दौऱ्यावर तो भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. ‌न्यूझीलंड तसेच बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हा या दोन्ही संघांमध्ये राहुलला स्थान मिळाले नाही. न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी राहुलने हे शतक ठोकल्याने निवड समितीचा निर्णय चुकला असल्याचे म्हटले जातेय. राहुलने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळताना एक शतक व‌ एका अर्धशतकासह 233 धावा फटकावल्या आहेत.

(Rahul Tripathi Smashing Century In Vijay Hazare Trophy Against Mumbai)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आमचे खेळाडू देशापेक्षा पैशाला महत्त्व देऊ लागलेत”; कॅरेबियन दिग्गज झाला भावूक
‘न्यूझीलंड दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी द्या’, बलाढ्य संघाच्या माजी दिग्गजाकडून अर्शदीपचे कौतुक  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---