टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडली. या विश्वचषकात उपांंत्यफेरीत मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला. विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारताचा विराट कोहली मायदेशी परतला. मायदेशी परतल्यानंतर तो आपल्या पत्नीसोबत उत्तराखंडमधील नैनीताल या ठिकाणी दिसला. नैनीतालमधील नीब करोरी बाबाच्या दर्शनाला आलेला कोहली सार्वजनिक ठिकाणी दिसल्याने चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी केली होती. विराटसोबत फोटो काढण्यासाठी चाहते खूपच उत्सूक दिसले आणि आपल्या आवडत्या क्रिकेटरसोबत घालवलेला वेळ कॅमेऱ्यात कैद केला.
टी20 विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत भारताला इंग्लंंडच्या हातून पराभव स्वीकारावा लागल. विश्वचषक संपल्यानंतर लगेच न्यूझीलंड दौरा आखण्यात आला. या दौऱ्यावर काही वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. त्यापैकीच विराट कोहली (Virat Kohli) हा एक खेळाडू आहे. मायदेशी परतल्यानंतर विराट कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तराखंडच्या नैनीताल या निसर्गरम्य ठिकाणी आला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील होती. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला जवळ पाहून चाहत्यांना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली. विराटनेही आपल्या चाहत्यांसोबत आनंदाने फोटो काढले.
विराटने या विश्वचषकात अतिशय चांगली खेळी केली. या विश्वचषकात त्याच्या सर्वाधिक धावा होत्या. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वगळता कोणताही फलंदाज आपला ठसा उमटवू शकला नाही. विराटने या विश्वचषकात खेळलेल्या 6 सामन्यात 496 धावा केल्या. आयसीसीनेे त्याला ऑक्टोबर महिन्याचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा पुरस्कारही देण्यात आला. पाकिस्तान विरुद्ध खेळलेली नाबाद 82 धावांची खेळी चाहत्यांना सदैव स्मरणात राहिल अशी ठरली.
विश्वचषकात पाकिस्तान विरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात भारत अडचणीत सापडला होता. भारताच्या जवळ-जवळ सर्वच फलंदाजांनी नांगी टाकली. मात्र, विराट एका ऊर्जेने संचारलेला होता. त्यानंतर त्याला हार्दिक पांड्याचीही साथ लाभली. या दोघांनीही भारताला विजय मिळवून दिला आणि 130 कोटी लोकांची दिवाळी आनंदाने साजरी झाली.(Virat Kohli spotted in UttaraKhand and clicked some photos with Fans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘प्रशिक्षकांना विश्रांतीची काय गरज?’; रवी शास्त्रींनी टोचले सपोर्ट स्टाफचे कान
AUS vs ENG | षटकार रोखण्यासाठी एश्टन एगरचा प्रयत्न यशस्वी, व्हिडिओ तुफान व्हायरल