Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

AUS vs ENG | षटकार रोखण्यासाठी एश्टन एगरचा प्रयत्न यशस्वी, व्हिडिओ तुफान व्हायरल

AUS vs ENG | षटकार रोखण्यासाठी एश्टन एगरचा प्रयत्न यशस्वी, व्हिडिओ तुफान व्हायरल

November 17, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Ashton Agar

Photo Courtesy: Twitter/cricketcomau


टी-20 विश्वचषक 2022 चा विजेता संघ इंग्लंड सध्या ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 विश्वचषकाच्या आधी इंग्लंडसोबत मायदेशात खेळलेल्या टी-20 मालिकेत पराभव स्वीकारला होता. त्यानंतर विश्वचषकात देखील त्यांचा संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. अशात एकदिवसीय मालिकेत चांगेल प्रदर्शन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील आहे. गुरुवारी (17 नोव्हेंबर) पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ चांगले प्रदर्शन करताना दिसला. यादरम्यान एश्टन एगर याने जबरदस्त क्षेत्ररक्षण संघासाठी षटकार रोखला. 

टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीच्या आधीच बाहेर पडला. अशात इंग्लंडविरद्ध मायदेशात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारी एडिलेड ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या नुकसानावर 287 धावा केल्या. यादरम्यान एश्टन एगर (Ashton Agar) याने जबरदस्त क्षेत्ररक्षण करून संघासाठी एक षटकार रोखला. एगरने मैदानात दाखवलेल्या चपळाईसाठी त्याचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

That's crazy!

Take a bow, Ashton Agar #AUSvENG pic.twitter.com/FJTRiiI9ou

— cricket.com.au (@cricketcomau) November 17, 2022

इंग्लंडच्या डावातील 45 व्या षटकात हा प्रकार घडला. या षटकात पॅट कमिन्स गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर डेविड मलान (Dawid Malan) स्ट्राईकवर होता. मलानने हा चेंडू डीप मीडविकेटच्या दिशेने षटकारासाठी खेळला होता. चेंडू बॅटला लागल्यानंतर वेगाने मैदानाबाहेर जात असतानाच सीमारेषेजवळ उभा असलेल्या एश्टन एगरने चपळाई दाखवत हवेद झेप मारली आणि चेंड पकडला. परंतु चेंडू पकडल्यानंतर तो सीमारेषेबाहेर जाणार होता, त्यामुळे त्याने हातातील चेंडू सीमारेषेच्या आत टाकला आणि स्वतः मात्र बाहेर जाऊन पडला. एगरच्या या क्षेत्ररक्षणासाठी सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांना प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना त्यांना सलामीवीर चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. जेसन रॉय 6, तर फिल सॉल्ट अवघ्या 14 धावा करून तंबूत परतले. असे असले तरी, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला डेविड मलानने 128 चेंडूत 134 धावांची सर्वात मोठी खेळी केली. मलानव्यतिरिक्त इंग्लंडचा एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि ऍडम झंपा यांनी या सामन्यात प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. (Ashton Agar Blocked a six by excellent fielding)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यूएईच्या गोलंदाजाने केले असे काही कृत्य, ज्यामुळे नेपाळ संघाला मिळाल्या फुकटच्या 5 धावा
भारताची फलंदाजी जुन्या पद्धतीची, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान  


Next Post
team-India-rahul-dravid

'प्रशिक्षकांना विश्रांतीची काय गरज?'; रवी शास्त्रींनी टोचले सपोर्ट स्टाफचे कान

Photo Courtesy: Twitter

आता बांगलादेश प्रिमियर लीग गाजवणार 'हा' भारतीय; यापूर्वी बिग बॅशमध्येही ठेवलेय पाऊल

Virat Kohli in Uttarakhand

उत्तराखंडमधील नीब करोरी बाबाच्या दर्शनाला पोहोचला विराट, चाहत्यांसोबतचे फोटो व्हायरल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143