Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे हे काय, भारताचा ‘तो’ फलंदाज षटकार मारण्याकडे लक्षच देत नाही; सांगितला बॅटींग प्लॅन

अरे हे काय, भारताचा 'तो' फलंदाज षटकार मारण्याकडे लक्षच देत नाही; सांगितला बॅटींग प्लॅन

November 18, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India-Against-South-Africa

Photo Courtesy: bcci.tv


भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याने आयपीएल 2022 गाजवले. त्याने गुजरात टायटन्सकडून खेळताना विजेतेपद जिंकण्याच्या प्रवासात महत्वाची भुमिका पार पाडली. मागील काही दिवसांपूर्वीच त्याने सईद मुश्ताक अली टॉफीमध्ये शतकी खेळी केली. त्याआधीच त्याची भारताच्या टी20 संघात निवड झाली होती, यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण करण्यास सज्ज आहे. त्याला न्यूझीलंडच्या दौऱ्यात टी20 सामने खेळण्याची संधी मिळणार हे जवळपास शक्य आहे, कारण या दौऱ्यात संघातून अनेक वरिष्ठ खेळाडूंना वगळले आहे.

न्यूझीलंडच्या दौऱ्यात भारत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली टी20 मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना शुक्रवारी (18 नोव्हेंबर) वेलिंग्टन येथे खेळला जाणार होता, मात्र पावसामुळे नाणेफेकही न होता सामना रद्द झाला. ही मालिका ऍमेझॉन प्राईमवर प्रक्षेपित होणार आहे. यावेळी शुबमन गिल (Shubman Gill) याने षटकाराबाबत चकित करणारे विधान केले आहे.

गिलने माध्यमांशी बोलताना म्हटले, “मी न्यूझीलंडमध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक खेळालयला पहिल्यांदा आलो होतो. 2019मध्येही वनडेमध्ये पदार्पण मी न्यूझीलंडमध्येच केले होते. यामुळे माझ्या न्यूझीलंडशी चांगल्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. टी20मध्ये मी वेगळे काही करण्याचा प्रयत्न करत आहे. मी षटकार मारण्याकडे अधिक लक्ष देत नाही तर वेळेवर लक्ष केंद्रित करतो. मी बॅट जोरात फिरवत चेंडू मारण्यासाठी वेळेवर लक्ष देतो.”

गिलने आयपीएल 2022च्या हंगामात पाचशेच्या जवळपास धावा केल्या होत्या. त्याने 16 सामन्यात 35च्या सरासरीने 483 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 अर्धशतके केली. अंतिम सामन्यात राजस्थान विरुद्ध खेळताना त्याने 45 धावा करत सामना जिंकून दिला होता.

गिलने कारकिर्दीत आतापर्यंत 95 टी20 सामने खेळताना 33च्या सरासरीने 2577 धावा केल्या. त्यामध्ये एक शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळताना 579 धावा आणि 12 वनडेतही तेवढ्याच धावा केल्या आहेत, यामध्ये मात्र त्याची सरासरी 57.9 आहे.

नुकत्याच झालेल्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 6 सामन्यात 52च्या सरासरीने 260 धावा केल्या. India’s ‘that’ batsman doesn’t pay attention to hitting sixes, said the batting plan

न्यूझीलंड दौऱ्यातील दुसरा टी20 सामना 20 नोव्हेंबरला माउंट मौनगानुईच्या बे ओव्हलवर खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“पाकिस्तान संघात सूर्यकुमार आणि हार्दिक हवे होते”
NZvIND: पावसामुळे क्रिकेटसोडून ‘हा’ कोणता खेळ खेळू लागले दोन्ही संघाचे खेळाडू? पाहा व्हिडिओ


Next Post
david warner

वॉर्नर आणि त्याचा गोंडस चाहता सोशल मीडियावर व्हायरल, मार्नस लाबुशेनकडे केली 'ही' मागणी

Simon-Doull

भारत- न्यूझीलंड सामन्यादरम्यान भडकले समालोचक, सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाण्याऱ्या देशातच मिळाली घाणेरडी सेवा

New Zealand Cricket & Trent Boult

न्यूझीलंडची साथ सोडलेल्या बोल्टबद्दल हे काय म्हणाला साथीदार साऊदी?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143