हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (18 नोव्हेंबर) वेलिंग्टन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजता खेळला जाणार आहे. भारताला टी20 विश्वचषक 2022च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले. या मालिकेसाठी भारतीय संघातीन नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांना तर सपोर्ट स्टाफलाही विश्रांती देण्यात आली. अशात संघात सलामीवीर म्हणून न्यूझीलंडविरुद्ध कोण मैदानात उतरेल, याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर संघात एक असा खेळाडू आहे, ज्याला पहिल्यांदाच भारताच्या टी20 संघात निवडले आहे. यामुळे तो पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल का.
शुबमन गिल (Shubman Gill) हा 23 वर्षीय फलंदाज यावर्षी चांगलाच फॉर्ममध्ये आहे. गिलने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद जिंकून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली होती. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध वनडेतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. यामुळे त्याला सलामीवीर म्हणून संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याने 95 टी20 सामने खेळताना 33.46च्या सरासरीने 2577 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारताच्या वनडे संघातून न्यूझीलंडविरुद्धच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
संघात इशान किशन देखील आहे. यालाही टी20मध्ये सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. तो सुरूवातीला गोलंदाजांवर दबाव निर्माण करतो. त्याचबरोबर संघात दिनेश कार्तिक ऐवजी रिषभ पंत याला जागा मिळाली आहे, त्यामुळे तो पूर्ण मालिकेत खेळण्याची शक्यता आहे. तसेच टी20 विश्वचषकात युझवेंद्र चहल याला संधी मिळाली नाही, त्यातच आर अश्विन संघात नसल्याने चहलला अंतिम अकरामध्ये जागा मिळण्याची अधिक अपेक्षा आहे.
मिचेल सँटनर याने टी20मध्ये संजू सॅमसन याला सात चेंडू टाकले असून त्यामध्ये त्याला दोनदा बाद केले आहे. सूर्यकुमार यादव याच्या 1040 धावा हे एका कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये दुसरीच वेळ आहे. भुवनेश्वर कुमार याने यावर्षी 36 टी-20 विकेट घेतल्या आहेत.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण ऍमेझॉन प्राईम आणि डीडी स्पोर्ट्सवर होणार आहे. Will Shubman Gill get a chance to T20I debut against New Zealand
दोन्ही संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन-
भारत – शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा/वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
न्यूझीलंड – फिन ऍलन, डेवॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यजमान मुंबई सिटी एफसीचा दणदणीत विजय, बंगळुरू एफसीचा सलग चौथा पराभव
राजस्थान रॉयल्सची झाली आहे चांदी, रीटेन केलेला ‘हा’ खेळाडू आहे भलत्याच फॉर्ममध्ये