Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यजमान मुंबई सिटी एफसीचा दणदणीत विजय, बंगळुरू एफसीचा सलग चौथा पराभव

यजमान मुंबई सिटी एफसीचा दणदणीत विजय, बंगळुरू एफसीचा सलग चौथा पराभव

November 18, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Mumbai City FC v BFC

Photo Courtesy: Twitter/ Mumbai City FC


मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) च्या या पर्वातील अपराजित मालिका कायम राखली. मुंबई सिटी एफसीने गुरूवारी घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत बंगळुरू एफसीवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. परेरा डियाझ ( १४ मि.), अपुईया राल्टे ( ३२ मि.), बिपिन सिंग ( ५८ मि.) आणि लालिआंझुआला छांग्टे ( ७४ मि. यांनी गोल केले. बंगळुरूची बचावफळी विस्कळीत दिसली. हिरो आयएसएलमध्ये मुंबई व बंगळुरू यांच्यात झालेल्या ११ पैकी केवळ एकच सामना अनिर्णीत राहिला आहे. मुंबई सिटीने ६ विजय मिळवले. मुंबई सिटीने विजयानंतर १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड अधिक मजबूत केली.

बिपिन सिंग, ग्रेग स्टीवर्ट यांनी पहिल्याच मिनिटाला मुंबईसाठी कॉर्नर मिळवला. पुढच्याच मिनिटाला अपुईया राल्टेने गोलजाळीच्या दिशेने हिट केला. मुंबई सिटीने पहिल्या पाच मिनिटांत बंगळुरूवर दडपण निर्माण करताना सातत्याने चेंडू त्यांच्या पेनल्टी क्षेत्रात घेऊन जाताना दिसले. बंगळुरूने आज स्टार खेळाडू सुनील छेत्रीला सुरूवातीपासून मैदानावर न उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. ११व्या मिनिटाला तांत्रिक कारणामुळे मैदानावरील वीज खंडित झाली होती. दोन मिनिटानंतर सामना सुरू झाला आणि १३व्या मिनिटाला यजमानांनी आघाडी घेतली. परेरा डियाझने सहज गोल केला.

बंगळुरूने त्यानंतर आक्रमण सुरू केला आणि १८ ते २१ या चार मिनिटांत त्यांनी पेनल्टी बॉक्समधून दोन सुरेख प्रयत्न झाले. बंगळुरूने रणनीतीत केलेला बदल पाहून त्यांचे फॅन सुखावले. २४व्या मिनिटाला नामग्याल भुतियाने लांबून मारलेला चेंडू मुंबईचा गोलरक्षक फुर्बा लाचेंपाने रोखला, परंतु चेंडू त्याच्या हातून निसटला. मुंबईचा एकही बचावपटू तेव्हा त्या ठिकाणी नव्हता आणि दानिश फारूकला आयती संधी होती, परंतु त्याने ती गमावली. बंगळुरूच्या डग आऊटमध्ये त्यानंतरचा नाराजीचा सूर प्रकर्षाने दिसला. २७व्या मिनिटाला बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत संधूने मुंबईचा गोल अडवला. मुंबईचेही काही प्रयत्न अयशस्वी ठरले. पण, ३२व्या मिनिटाला बंगळुरूच्या बचावपटूंनी त्यांच्या पेनल्टी क्षेत्रातच चुका केल्या आणि अपुईया राल्टेने सहज गोल केला. गुरप्रीत चेंडू गोलजाळीत जाताना पाहण्यापलीकडे काहीच करू शकला नाही.

पहिल्या हाफमध्ये बंगळुरूने प्रयत्न केले, परंतु चेंडूला अंतिम दिशा देण्यात ते सातत्याने अपयशी ठरले. मध्यंतरानंतर यजमानांच्या खेळात सातत्य पाहायला मिळाले, तर बंगळुरू कडूनही बरोबरीसाठी संघर्ष दिसला. मुंबईने आक्रमणाची धार अधिक तीव्र करताना बंगळुरूच्या बचावपटूंना दडपणात ठेवले. बिपिन व स्टीवर्ट यांचा खेळ आज उल्लेखनीय झाला आणि ५८व्या मिनिटाला बिपिनने गोल केला. परेरा डियाझ मध्यरेषेपासून चेंडू घेऊन बंगळुरूच्या पेनल्टी क्षेत्रात शिरला अन् वन ऑन वन स्थिती असताना त्याने तो बिपिनच्या दिशेने पास केला. बिपिनने कोणतीच चूक न करता मुंबई सिटीला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. ७१व्या मिनिटाला राल्टेच्या जागी प्रशिक्षकांनी विनित रायला मैदानावर उतरवले. ७४व्या मिनिटाला पुन्हा एकदा बंगळुरूच्या बचावपटूंनी चूक केली आणि लालिआंझुआला छांग्टेने सोपा गोल करताना मुंबईला ४-० अशी आघाडी मिळवून दिली.

FT: MCFC 4⃣-0⃣ BFC

A FOURmidable performance from #TheIslanders puts us at just 1⃣ point behind the league leaders on the #HeroISL table.

What an absolute goal-fest this match was 💙#MCFCBFC #MumbaiCity #AamchiCity🔵 pic.twitter.com/VF9omXnAwC

— Mumbai City FC (@MumbaiCityFC) November 17, 2022

बंगळुरूच्या खेळाडूंची अवस्था पाहून मुख्य प्रशिक्षक सिमॉन ग्रेसनही प्रचंड नाराज दिसले. मुंबई सिटीच्या तुलनेत बंगळुरूचे खेळाडू कोणत्याच आघाडीवर सक्षम दिसले नाही आणि त्यामुळे मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर झाला. ३ मिनिटांतच्या भरपाई वेळेतही बंगळुरूला गोलखाते उघडता आले नाही. मुंबईने यंदाच्या पर्वातील तीन क्लीन शीट राखल्या.

निकाल – मुंबई सिटी एफसी ४ ( परेरा डियाझ १४ मि., अपुईया राल्टे ३२ मि., बिपिन सिंग ५८ मि., लालिआंझुआला छांग्टे  ७४ मि.) विजयी वि. बंगळुरू एफसी ०.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सची झाली आहे चांदी, रीटेन केलेला ‘हा’ खेळाडू आहे भलत्याच फॉर्ममध्ये
प्रीमियर लीगसह FSDLची भागीदारी भारतीय फुटबॉलमध्ये भरीव सुधारणा करू शकते – प्रीमियर लीगचा दिग्गज खेळाडू पॉल डिकोव्ह


Next Post
Shubman-Gill

न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलला टी20 पदार्पणाची संधी मिळेल का? पाहा दोन्ही संघाची संभावित प्लेईंग इलेव्हन

Kane Williamson & Hardik Pandya

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 आकडेवारी! मालिकावीर केएल राहुल, सुपर ओव्हर्समध्ये इंडियाचा विजय आणि बरेचं काही

MS Dhoni & SumeetKumar Bajaj

एमएस धोनीचा क्रिकेटनंतर टेनिस कोर्टवर जलवा, 'या' चॅम्पियनशिपमध्ये जिंकले दुहेरीचे विजेतेपद

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143