महिला आशिया चषक (Women’s Asia Cup) शेवटच्या टप्प्यात आला आहे. उद्या (26 जुलै) रोजी सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. भारत सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा सामना करणार आहे. तत्पूर्वी यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करुनही, सलामीवीर शफाली वर्मानं (Shafali Verma) सांगितले की, शुक्रवारी बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी भारताला अजून सुधारणा करावी लागेल.
यंदाच्या महिला आशिया चषक स्पर्धेत (Women’s Asia Cup) शफालीनं 3 सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 52 पेक्षा जास्त सरासरीनं 158 धावा केल्या आहेत. अ गटामध्ये भारतानं पाकिस्तानला 7 विकेट्सनं धूळ चारली. यूएईचा 78 धावांनी तर नेपाळचा 82 धावांनी पराभव केला आणि आता सेमीफायनल सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. सेमीफायनल 1 मध्ये भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे.
शफाली वर्मा (Shafali Verma) म्हणाली, “आम्ही सर्व सामने जिंकत आहोत आणि एक संघ म्हणून चांगली कामगिरी करत आहोत ही चांगली भावना आहे. सेमीफायनल सामना खूप महत्त्वाचा आहे. आम्ही कठोर मेहनत करत आहोत आणि आशा आहे की आम्ही रणनीती अंमलात आणू शकू.”
पुढे बोलाताना शफाली म्हणाली, ”आम्ही फलंदाजी युनिट म्हणून आमच्या ताकदीवर अवलंबून आहोत. गोलंदाजही नेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत पण सतत सुधारणा करणे आवश्यक आहे. आम्ही क्षेत्ररक्षणासाठी देखील खूप मेहनत घेत आहोत. तर आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांना फलंदाजीची फारशी संधी मिळालेली नाही. पण दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर आणि इतर सर्व खालच्या फलंदाजांनी चांगला सराव केला आहे आणि मला खात्री आहे की जेव्हाही त्यांना संधी मिळेल तेव्हा ते काही षटकार मारायला तयार असतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL: भारत विरुद्ध श्रीलंका टी20 सामन्यावर पावसाचं सावट
Women’s Asia Cup: (26 जुलै) रंगणार सेमीफायनलचा थरार…! भारतासमोर बांगलादेशचं मोठं आव्हान
‘या’ दोघांपैकी एकच फलंदाज इलेव्हनमध्ये खेळू शकेल, कारण पंतची जागा निश्चित आहे; माजी फील्डिंग कोचचे मत