आशियातील सर्वात मोठी विविध खेळांची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एशियन गेम्सचा शनिवारी (7 ऑक्टोबर) समारोप झाला. भारतीय पथकाने शनिवारी अखेरीस बुद्धिबळ स्पर्धा खेळली. भारताच्या महिला बुद्धिबळ संघाने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताचे अभियान यशस्वीरित्या संपवले. या स्पर्धेत भारताने एकूण 107 पदके आपल्या नावे केली. ही भारताची आशियाई खेळांमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यासह भारताने स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आपली मोहीम समाप्त केली.
India finish their campaign at Hangzhou Asian Games with their BEST EVER Medal haul:
107 medals: 28 🥇 | 38 🥈 | 41 🥉India will finish at 4th spot in Medal Tally.
Its our best ever standing since 1962 Jakarta Asiad, where we finished 3rd. #AGwithIAS #IndiaAtAsianGames— India_AllSports (@India_AllSports) October 7, 2023
यावेळी शंभर पदकांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय पथकाने पहिल्या दिवसापासून शानदार खेळ दाखवला. भारतीय संघाने 23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विविध खेळांमध्ये भाग घेत ही 107 पदके जिंकली. यादरम्यान भारताने 28 सुवर्णपदके, 38 रौप्य व 41 कांस्यपदके जिंकली. यापूर्वी भारताची सर्वोत्तम कामगिरी 2018 इंचऑन आशियाई खेळांमध्ये केलेली. त्यावेळी भारताने 70 पदके जिंकलेले.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या खात्यात तब्बल 12 पदके जमा झाली. यामध्ये सहा सुवर्णपदके, चार रौप्य व दोन कांस्य समाविष्ट आहेत. भारताने अखेरच्या दिवशी कबड्डीच्या महिला व पुरुष, पुरुष क्रिकेट, बॅडमिंटन पुरुष दुहेरी, तिरंदाजी पुरुष एकेरी व महिला एकेरी अशी सहा सुवर्णपदके जिंकली.
भारताने यावेळी ॲथलेटिक्स, तिरंदाजी व नेमबाजी या खेळांमध्ये कमालीचे सातत्य दाखवत सर्वाधिक पदके जिंकली. यावर्षी पदकतालिकेत चीनने आपला दबदबा कायम राखला. त्यानंतर जपान व दक्षिण कोरियाने सर्वाधिक पदके जिंकली. भारतीय संघाने 1962 जकार्ता एशियन गेम्सनंतर आपली सर्वोत्तम कामगिरी करताना हे चौथे स्थान पटकावले. त्या स्पर्धेत भारताने तिसरे स्थान मिळवलेले.
(India Won 107 Medals In Hangzhou Asian Games Finish 4th)
हेही वाचा-
‘एक पराभव आमचं काहीही…’, न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव होताच इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराचे बडेबोल
“मला लाज वाटतेय…”, बीसीसीआयच्या वर्ल्डकप आयोजनावर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया