सलामीवीर संजू सॅमसनच्या झंझावाती शतकानंतर वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या फिरकी जोडीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 202 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, यजमान संघ 17.5 षटकांत 141 धावांवर ऑलआऊट झाला. या विजयासह भारतानं एक असा विक्रम केला, जो याआधी कोणत्याही संघाला करता आला नव्हता.
वास्तविक, भारताचा या वर्षातील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा 23वा विजय आहे. आता एका कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक विजयांच्या यादीत टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. युगांडा या यादीत पहिल्या स्थानावर आहे, ज्यांनी 2023 मध्ये 29 सामने जिंकले होते. तेव्हा त्यांची विजयाची टक्केवारी 87.9 होती. तर 2024 मध्ये टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 95.60 आहे. ही एका कॅलेंडर वर्षात किमान 12 सामने खेळल्यानंतर कोणत्याही संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
भारतानं दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत 10 टी20 सामने खेळले. यापैकी टीम इंडियानं 7 सामने जिंकले, तर 3 सामन्यात पराभव पाहिला. डरबनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा सलग पाचवा पराभव आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कोणत्याही मैदानावर ही त्यांची सर्वात खराब कामगिरी आहे. या मैदानावर त्यांनी शेवटचा सामना मार्च 2016 मध्ये जिंकला होता.
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, नाणेफेक हरल्यानंतर भारतानं प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या 107 धावांच्या बळावर 20 षटकांत 202 धावा केल्या. प्रत्तुत्तरात, दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंसमोर पूर्णपणे ढेपाळले. संपूर्ण संघ 19 चेंडू शिल्लक असताना 141 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे भारतानं 61 धावांनी मोठा विजय मिळवला.
हेही वाचा –
Prithvi Shaw Birthday : एकेकाळी सचिन तेंडुलकरशी तुलना व्हायची, आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही संधी मिळेना!
भारताचा व्हाईटवॉश! ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध ऋतुराज ब्रिगेडचा दारुण पराभव
टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! अहवालात धक्कादायक खुलासा