भारतीय संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात श्रीलंकेला (India vs Sri Lanka) पराभूत केले. पहिल्या सामन्यात भारताने ६२ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशालाच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या साामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. यासोबतच भारताने ही टी२० मालिकाही आपल्या खिशात घातली. भारताच्या या विजयाचा शिल्पकार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत १८३ धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंका संघाने दिलेले १८४ धावांचे आव्हान भारतीय संघाने १७.१ षटकातच पूर्ण केले.
That's that from the 2nd T20I.
74* from @ShreyasIyer15, 39 from @IamSanjuSamson
and a brilliant 18-ball 45* from @imjadeja as #TeamIndia seal the T20I series.Scorecard – https://t.co/ImBxdhXjSc #INDvSL @Paytm pic.twitter.com/ELvnJ3RrgN
— BCCI (@BCCI) February 26, 2022
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४० चेंडूंचा सामना करताना नाबाद ६९ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने ४ षटकार आणि ५ चौकारांचा पाऊसही पाडला. श्रेयससोबतच रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांनीही प्रत्येकी ३९ धावांची खेळी केली. यावेळी जडेजाने १ षटकार आणि ६ चौकार ठोकले, तर सॅमसनने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. जडेजाने या सामन्याचा शेवट केला. त्याने १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत संघाला सामना जिंकून दिला. याव्यतिरिक्त पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा इशान किशन या सामन्यात १६ धावांवर, तर कर्णधार रोहित फक्त १ धाव करत तंबूत परतला.
यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना लाहिरू कुमाराने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर दुष्मंता चमीराने रोहितची महत्त्वपूर्ण १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाकडून पथूम निसांकाने सर्वाधिक धावा कुटल्या. त्याने ५३ चेंडूत ७५ धावा केल्या. यामध्ये ११ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार दसून शनाकाने नाबाद ४७ धावा आणि दनुष्का गुणतलिकाने ३८ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताने खेळलेल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांतील हा सलग ११ वा विजय होता. विशेष म्हणजे भारताचा हा श्रीलंकेविरुद्धचा १६ वा विजय होता.
आता ३ सामन्यांच्या टी२० मालकेतील शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) धरमशालाच्या मैदानावर पार पडेल.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीत सोडा, हिटमॅन रोहितचं क्षेत्ररक्षणातही अर्धशतक, बनला पहिलाच भारतीय; बघा तो खास क्षण
अय्यरमुळे पूर्ण झाला जडेजाचा बदला! सलग ६, ४, ६ ठोकणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाला असं केलं चालतं