बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 91 वर्षांच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच असं काही केलं, जे यापूर्वी कधीही घडलेलं नाही. डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. याशिवाय महिला विभागातही भारतानं सुवर्णपदक पटकावलं. दुसरीकडे, गुकेशन वैयक्तिक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं. अशा प्रकारे भारतानं प्रथमच 3 सुवर्णपदक जिंकली आहेत.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतानं या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे खेळल्या जात असलेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये गुकेशनं व्लादिमीर फेडोसेव्हचा पराभव केला, तर एरिगेसीनं जान सुबेलचा पराभव केला.
18 वर्षीय डी गुकेशनं सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्यानं वैयक्तिक स्पर्धेमध्ये हे यश मिळवलंय. यापूर्वी त्यानं 2022 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर सलग दोन सुवर्णपदकं जिंकणारा गुकेश हा दुसरा भारतीय ठरला. तसेच तो 16वा विश्वचषक बुद्धिबळ मास्टर बनला आहे.
या विभागात पहिलं स्थान मिळवण्यासाठी भारतीय पुरुष संघाला शेवटच्या फेरीत फक्त ड्रॉची आवश्यकता होती. पण भारतानं दोन सामने जिंकले, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीननं अमेरिकेविरुद्ध गुण गमावले. भारतीय पुरुष संघात डी गुकेश, अर्जुन एलिगेसी, विदित गुजराती, पेंटला हरिकृष्णा, आर प्रज्ञानंद आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश होता. तर महिला विभागात भारतानं अखेरच्या सामन्यात अझरबैजानचा 3.5-0.5 ने पराभव केला. महिला संघात हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव यांचा समावेश होता.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारतानं दोन्ही विभागात (महिला आणि ओपन) सुवर्णपदक जिंकलं. भारताला यापूर्वी कधीही एवढं यश मिळालं नव्हतं. दोन वर्षांपूर्वी भारतानं बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. यापूर्वी 2014 मध्येही भारताला कांस्यपदक मिळालं होतं.
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार खेळ केला. टीम इंडियानं सलग 8 सामने जिंकले आणि नंतर गतविजेत्या उझबेकिस्तानसोबत ड्रॉ खेळला. यानंतर 21 सप्टेंबर रोजी अव्वल मानांकित अमेरिकन संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं.
हेही वाचा –
दक्षिण आफ्रिकेनं लाज राखली, अफगाणिस्ताननं 3-0 ने केला असता क्लीन स्वीप
3 युवा खेळाडू ज्यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली, भारताच्या कसोटी संघात मिळू शकते जागा
संघ हरला पण पठ्ठ्याने मन जिंकलं! साई सुदर्शनने झुंजार शतक करत टीम इंडियासाठी ठोकला दावा