भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात शानदार विजय मिळवला. रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माँगनुई येथे पार पडलेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडने 65 धावांना विजय मिळवला. भारताच्या विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. त्याला सामनीवीर म्हणून गौरवण्यात आले. यासह भारताने या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 191 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला 6 विकेट्स गमावत 18.5 षटकात 126 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 65 धावांनी जिंकला.
India take a 1-0 lead in the T20I series with a convincing win at the Bay Oval 🙌
Watch the #NZvIND series live on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺 pic.twitter.com/VZLav2DFQh
— ICC (@ICC) November 20, 2022
न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने 52 चेंडूत 61 धावा केल्या. त्याने 2 षटकार आणि 4 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. डेवॉन कॉनवे याने 25 धावांचे योगदान दिले. ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेल यांनी अनुक्रमे 12 आणि 10 धावा चोपल्या.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना 2.5 षटकात 10 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.
भारताचा डाव
यावेळी भारताकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने या सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावांची वादळी शतकी खेळी केली. या धावा करताना त्याने तब्बल 7 षटकार आणि 11 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त फक्त इशान किशन (Ishan Kishan) याने 36 धावांचे योगदान दिले. तसेच, कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी प्रत्येकी 13 धावा चोपल्या. रिषभ पंत (Rishabh Pant) 6 धावांवर तंबूत परतला. दुसरीकडे, भारताचे तीन फलंदाज शून्य धावेवर तंबूत परतले.
यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना टीम साऊदी याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 34 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने शेवटच्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची हॅट्रिक विकेट घेतली. त्याच्याव्यतिरिक्त, लॉकी फर्ग्युसन याने 2 आणि ईश सोधी याने 1 विकेट घेतली. (india won by 65 runs against new zealand 2nd t20)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ विलक्षण घटना, सलामीला पहिल्यांदाच..
संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित