बंगळूरू। पहिलीच कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानला भारताविरुद्ध दुसऱ्याच दिवशी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानवर एक डाव 262 धावांनी विजय मिळवला.
14 जूनला सुरु झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 474 धावा केल्या होत्या. यानंतर आज 15 जूनला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानचा संघ फलंदाजीसाठी उतरला होता.
त्यांना पहिल्या डावात सर्वबाद 109 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानला फॉलोआॅन दिला. अफगाणिस्तानचा दुसरा डावही आजच 38.4 षटकात संपुष्टात आला.
अफगाणिस्तानच्या दुसऱ्या डावाची सुरवातही पहिल्या डावाप्रमाणे खराब झाली. त्यांचे मोहम्मद शेहजाद(13), जावेद अहमदी(3), मोहम्मद नबी(0) आणि रेहमत शहा(4) हे फलंदाज पहिल्या 10 षटकातच बाद झाले.
त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ दाबावाखाली आला. दबावाखाली कर्णधार असघर स्टॅनिकझाई(25) आणि हशमतुल्लाह शाहिदीने(36*) थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनी मिळून 5 व्या विकेटसाठी 37 धावांची भागिदारी रचली. परंतू रविंद्र जडेजाने स्टॅनिकझाईला झेलबाद करत ही जोडी फोडली.
त्यानंतर एकाही फलंदाजाला अनुभवी भारतीय गोलंदाजीसमोर टीकाव धरता आला नाही. फक्त नंतर आलेल्या रशीद खानने शाहिदीला साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यालाही जडेजाने त्रिफळाचीत केले.
एका बाजूने विकेट जात असताना शाहिदी खेळपट्टीवर एकाकी लढत देत होता. तोच अखेर नाबाद राहिला.
भारताकडून जडेजाने या डावात सर्वाधिक 17 धावात 4 विकेट घेतल्या. तसेच उमेश यादव (26/3), इशांत शर्मा(2/17) आणि आर अश्विन (1/32) यांनी विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: सर्वबाद 474 धावा
अफगाणिस्तान पहिला डाव: सर्वबाद 109 धावा (फॉलोआॅन)
अफगाणिस्तान दुसरा डाव: सर्वबाद 103 धावा
महत्त्वाच्या बातम्या:
–फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला
–तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात
–पहिल्याच कसोटीत अफगाणिस्तानवर फॉलोआॅनची नामुष्की!