---Advertisement---

ENGvsIND: हार्दिकच्या ‘अष्टपैलू’ प्रदर्शनाचा कहर, पहिल्या टी२०त भारताची इंग्लंडवर ५० धावांनी मात

On: शुक्रवार, जुलै 8, 2022 8:09 AM
Hardik-Pandya-Rohit-TeamIndia
---Advertisement---

पाचव्या कसोटी सामन्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गुरुवारी (०७ जुलै) पहिला टी२० सामना खेळला गेला. साउथम्पटन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या धमाकेदार प्रदर्शनामुळे भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडवर ५० धावांनी मात केली आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

या सामन्यात (IND vs ENG) प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १९.३ षटकात १४८ धावांवरच गुंडाळला गेला.

भारतीय गोलंदाजांचे भेदक प्रदर्शन
भारताच्या १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. इंग्लंडकडून एकाही फलंदाजाला साधे अर्धशतकही करता आले नाही. मोईन अली याने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. २० चेंडू खेळताना २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ही खेळी त्याने केली. तसेच हॅरी ब्रूक (२८ धावा), डेविड मलान (२१ धावा), ख्रिस जॉर्डन (नाबाद २६ धावा) यांना दुहेरी धावा करता आल्या. इतर ७ फलंदाज एकेरी धावेवरच तंबूत परतले. कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) तर पहिल्याच चेंडूवर शून्यावर विकेट गमावली.

या डावात भारताकडून हार्दिकने (Hardik Pandya) प्रशंसनीय गोलंदाजी केली. त्याने ४ षटके फेकताना ३३ धावा देत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये कर्णधार बटलरच्या विकेटचाही समावेश होता. तसेच अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले. भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल यांनाही एक-एक विकेट मिळाल्या.

हार्दिकची झंझावाती खेळी
तत्पूर्वी भारताकडून प्रथम फलंदाजी करताना हार्दिकने चमकदार कामगिरी केली होती. त्याने मधल्या फळीत संघाचा मोर्चा सांभाळताना ३३ चेंडूत ५१ धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून १ षटकार आणि ६ चौकार निघाले होते. तसेच सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत ३९ आणि दीपक हुड्डाने १७ चेंडूत ३३ धावा फटकावल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा पुनरागमनात १४ चेंडूत २४ धावा करून बाद झाला होता. या डावात मोईन अली आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी २-२ विकेट्स मिळाल्या होत्या.

हार्दिकला त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

‘विराट ठग नाही, तो एक उत्कृष्ठ खेळाडू’, कोहलीला टार्गेट करणाऱ्या इंग्लिश मीडियावर दिग्गजाचा संताप

पूजा वस्त्राकरचा विश्वविक्रम, बनली ‘अशी’ कामगिरी करणारी जगातील पहिला महिला क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---