भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी (०९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्सच्या नुकसानावर २३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ गारद झाला. परिणामी भारताने ४४ धावांनी हा सामना जिंकला आहे. याबरोबरच मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे.
भारताच्या २३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून शामराह ब्रुक्सने सर्वाधिक ४४ धावा केल्या. ६४ चेंडूंचा सामना करताना २ चौकार आणि २ षटकार मारत त्याने ही खेळी केली. परंतु भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इतर फलंदाजांचा मात्र टिकाव लागला नाही.
#TeamIndia win the second @Paytm #INDvWI ODI & take an unassailable lead in the series. 👏 👏
4⃣ wickets for @prasidh43
2⃣ wickets for @imShard
1⃣ wicket each for @mdsirajofficial, @yuzi_chahal, @Sundarwashi5 & @HoodaOnFireScorecard ▶️ https://t.co/yqSjTw302p pic.twitter.com/bPb1ca9H7P
— BCCI (@BCCI) February 9, 2022
भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने संघाला ४ महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. त्याच्या साथीला शार्दुल ठाकूरने २ विकेट्स घेतल्या. तसेच वनडे कारकिर्दीतील केवळ दुसरा सामना खेळत असलेल्या दिपक हुड्डाला या सामन्यात त्याची पहिलीवहिली विकेट मिळाली. त्याने अर्धशतकी खेळीच्या वाटेवर असलेल्या शामराह ब्रुक्सला बाद केले.
Innings Break!#TeamIndia post 237/9 on the board in the 2nd @Paytm #INDvWI ODI!
6⃣4⃣ for @surya_14kumar
4⃣9⃣ for @klrahul11Over to our bowlers now. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/yqSjTw302p pic.twitter.com/uSwZSxYLJt
— BCCI (@BCCI) February 9, 2022
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताकडून सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी मोठ्या खेळी केल्या. केवळ ४३ धावांवर कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत आणि विराट कोहली, हे आघाडीचे ३ फलंदाज पव्हेलियनला परतले होते. परंतु पुढे राहुल आणि सूर्यकुमारने ९० धावांची भागिदारी करत संघाची डगमगती गाडी सावरली. राहुल वैयक्तिक ४९ धावा करून धावबाद झाला. तर सूर्यकुमार ८३ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या वनडेतील सर्वोच्च वैयक्तिक ६४ धावा करून माघारी परतला. पुढे वॉशिंग्टन सुंदर आणि दिपक हुड्डा यांनी प्रत्येकी २४ आणि २९ धावांचे योगदान देत संघाला २३७ धावांपर्यंत पोहोचवले.
वेस्ट इंडिजकडून या डावात अल्झारी जोसेफ आणि ओडेन स्मिथ यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांनी दोघांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच इतर वेस्ट इंडिज गोलंदाजांनी एका-एका विकेटचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
चुरशीच्या लढतीत यूपी योद्धांची बाजी, तमिळ थलाईव्हाजला २ गुणांनी चारली धूळ
रिषभने दुसऱ्या वनडेत उगाच दिली नाही सलामी, कर्णधार आणि प्रशिक्षकाने खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय
भारतीय महिलांची हाराकिरी, न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव टी२०त १८ धावांनी पराभूत