बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियमवर दक्षिण आशियाई फुटबॉल कप म्हणजेच सॅफ कपला सुरुवात झाली. भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या या सामन्यात यजमान भारत संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत 4-0 असा विजय मिळविला. कर्णधार सुनील छेत्री याने झळकावलेली हॅट्रिक भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. यासह भारतीय संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
चारच दिवसांपूर्वी इंटर कॉन्टिनेन्टल कप जिंकलेल्या भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे दावेदार मानले जात होते. तब्बल पाच वर्षानंतर हे दोन्ही संघ आमने-सामने आलेले. पहिल्याच मिनिटाला मिळालेल्या फ्री किक वर गोल करण्यात अनिरुद्ध थापाला यश आले नाही. दहाव्या मिनिटाला भारतीय संघाला कर्णधार सुनील छेत्री याने गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 16 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी किकवर छेत्रीने गोल करत आघाडी वाढवली. त्यानंतर दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, हाफ टाइमपर्यंत गोल फलक 2-0 असा भारताच्या बाजूने राहिला.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला सहल व कुरूनियन यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी दवडल्या. पाकिस्तानच्या मुहम्मद सुफयान आसिफने 73 व्या मिनिटाला पेनल्टी एरियात फाऊल केला आणि भारताला पेनल्टी मिळाली. कर्णधार छेत्रीने या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात कोणतीही चूक केली नाही. त्याने तिसरा गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर 81व्या मिनिटाला अन्वर अलीच्या पासवर उदांता सिंगने चेंडू नेटमध्ये टाकून भारताचा चौथा आणि आपला पहिला गोल केला. त्यानंतर उर्वरित वेळेत पाकिस्तानने आक्रमक खेळ दाखवला मात्र भारताच्या भक्कम बचाव पुढे ते निष्क्रिय ठरले. (India won the football match against Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
धोनीची रणनीती वापरल्यामुळे पहिल्या ऍशेस सामन्यात इंग्लंडला फायदा! स्टोक्सकडून भारतीय दिग्गजाचे अनुकरण
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला पहिल्याच घासाला खडा! आयसीसीची मोठी कारवाई; नव्या डब्ल्यूटीसी हंगामातही नुकसान