---Advertisement---

चौथ्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

On: रविवार, मार्च 10, 2019 1:18 PM
---Advertisement---

मोहाली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज चौथा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहे. आज 11 जणांच्या भारतीय संघात रिषभ पंत, केएल राहुल, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळाली आहे.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असल्याने त्याच्याऐवजी पंतला संधी मिळाली आहे.

तर अंबाती रायडू ऐवजी राहुलला, मोहम्मद शमी ऐवजी भुवनेश्वर कुमारला आणि रविंद्र जडेजा ऐवजी चहलला संधी मिळाली आहे.

भारतीय संघ 5 सामन्यांच्या या वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पुढे आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकाही खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे, तर ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

असे आहेत 11 जणांचे संघ-

भारत- विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत, केदार जाधव, विजय शंकर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया- ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स,  ऍडम झम्पा, ऍश्टन टर्नर, झाय रिचर्डसन, जेसन बेऱ्हेंन्डॉर्फ

महत्त्वाच्या बातम्या –

एवढं चांगल खेळत असूनही कोहलीसमोर आहे हे मोठं संकट

सगळ्या पाकिस्तानच्या खेळाडूंएवढ्या सेंच्युरी केल्यात एकट्या किंग कोहलीने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment