एमर्जिंक एशिया कप 2023चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघात खेळला जात आहे. रविवारी (23 जुलै) हा सामना सुरू होण्याआधी भारतीय संघाचा कर्णधार यश धूल याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. उपांत्य सामन्यात पाकिस्तानकडून श्रीलंकेचा पराभव झाला होता. तर भारतीय संघ बांगलादेशला उपांत्य सामन्यात पराभूत करून अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
🚨 Toss Update 🚨
India 'A' win the toss and elect to field first in the Final!
Follow the Match – https://t.co/qztT65tDLs#ACCMensEmergingTeamsAsiaCup | #ACC pic.twitter.com/42SVjSmDn5
— BCCI (@BCCI) July 23, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत अ – बी साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश धुल (कर्णधार), रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मानव सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, राजवर्धन हंगरगेकर.
पाकिस्तान अ – सॅम अयूब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मोहम्मद हारिस (कर्णधार, यष्टीरक्षक), मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम, अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.
उभय संघांतील हा सामना फॅनकोड या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहण्यासाठी उपलब्ध आहे. टीव्हीवर सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना लाईव्ह दाखवला जात आहे. (India won the toss and they’ve decided to bowl first against Pakistan in the Emerging Asia Cup Final.)
महत्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणेने एका हातात पकडला स्टनिंग कॅच! फलंदाजालाही नाही बसला विश्वास
विराटच्या 500व्या सामन्यात अश्विन-जडेजा जोडीही पूर्ण करणार 500चा आकडा? माजी दिग्गजांचा विक्रम मोडणार