टी20 विश्वचषकात (T20 World Cup)रविवारी (30 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना खेळला जाणार आहे. हा सामना पर्थच्या ऑप्टन स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याची सुरूवात भारताच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी होणार असून त्याआधी झालेल्या नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. त्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उपांत्य फेरीसाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी आवश्यक आहे.
या सामन्यात विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) कायम आहे, तर दोन्ही संघामध्ये एक बदल झाला आहे. भारतामध्ये अष्टपैलू दीपक हुडा (Deepak Hooda) याची संघात एंट्री झाली. त्याला अक्षर पटेल याच्याजागी संघात घेतले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या संघात तबरेझ शम्सी याच्याऐवजी लुंगी एनगिडी आला आहे.
टी20 क्रिकेटमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका आतापर्यंत 23 वेळा समोरा-समोर आली आहेत. आता ही त्याची 24वी वेळ आहे, एकमेंकाविरोधात खेळण्याची. त्यातील 13 सामने भारताने आणि 9 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. त्याचबरोबर टी20 विश्वचषकाची आकडेवारी पाहिली तर पाच वेळा हे दोन संघ भिडले आहेत. त्यातील चार सामने भारताने आणि एक सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता.
भारताने टी20 विश्वचषकात 2007, 2010, 2012 आणि 2014मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला. शेवटचे ते टी20 विश्वचषकात 2014मध्ये एकमेकांविरोधात खेळले होते. 2009मध्ये नॉटींघम येथे झालेला सामना दक्षिण आफ्रिके जिंकला. त्यांची ही टी20 विश्वचषकात भारताविरुद्धची एकमेव विजय होता.
दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन-
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
???? Toss & Team News from Perth ????@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bat against South Africa. #T20WorldCup | #INDvSA
Follow the match ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6
1⃣ change to our Playing XI as @HoodaOnFire is named in the team ???? pic.twitter.com/X9n5kLoYNn
— BCCI (@BCCI) October 30, 2022
बाकावर- अक्षर पटेल, रिषभ पंत, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल
दक्षिण आफ्रिका संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रायली रुसो, एडन मार्करम, ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, ऍनरिक नॉर्टजे.
TEAM ANNOUNCEMENT ????
1⃣ Solitary change
➡️ Lungi Ngidi is brought in
⬅️ Tabraiz Shamsi misses out???????? India have won the toss and will bat first
????️ Ball by ball https://t.co/KNz7vLG39F
???? SuperSport Grandstand 201#INDvSA #T20WorldCup #BePartOfIt pic.twitter.com/12nN3wtcpb— Proteas Men (@ProteasMenCSA) October 30, 2022
बाकावर- तबरेझ शम्सी, हेनरिक क्लासेन, मार्को जॅन्सन, रीझा हेंड्रिक्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लवकरच होणार आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड? या एका खेळाडूच्या बदल्यात दोघांना…
कॅप्टन रोहितच्या निशाण्यावर वर्ल्डरेकॉर्ड, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘हा’ विक्रम रचण्याची संधी






