भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला होता. या निर्णायक सामन्यातील नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
#TeamIndia have won the toss and elect to bat first in the series decider match.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/1uCKYafzzD #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/BbOibgv0kG
— BCCI (@BCCI) February 1, 2023
पहिल्या दोन सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघापेक्षा सरस खेळ दाखवला होता. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने एकतर्फी विजय मिळवलेला. तर, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 100 धावांसाठी संघर्ष करायला लावला होता. त्यामुळे या सामन्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
या सामन्यासाठी उभय संघात प्रत्येकी एक बदल करण्यात आला. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असल्याने फिरकीपटू युझवेंद्र चहल याला बाकावर बसवत उमरान मालिकला संधी देण्यात आली. तर, पृथ्वी शॉ याला पुन्हा डावलले गेले. दुसरीकडे न्यूझीलंडने जेकब डफी याच्या जागी बेन लिस्टर याला दौऱ्यावर प्रथमच संधी देण्यात आली.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन-
शुबमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन-
फिन ऍलन, डेवॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, बेन लिस्टर
(India Won Toss And Choose Batting In 3rd T20I In Ahmedabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूच्या मित्राचा रणजीत धमाका; नवव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलं खणखणीत शतक
मोठी बातमी! आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर