इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना गुरुवारी (१४ जुलै) लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ टी२० मालिकेनंतर सलग वनडे मालिकाही जिंकण्याच्या तयारीने मैदानावर उतरेल. तर इंग्लंडचा संघ मागील पराभवाचा वचपा काढत मालिकेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असेल. इंग्लंडने २०१४ पासून घरच्या मैदानावर एकदाही द्विपक्षीय वनडे मालिका गमावलेली नाही.
तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता या सामन्यासाठी नाणेफेक झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली असून त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
2ND ODI. India won the toss and elected to field. https://t.co/N4iVtxbNBF #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 14, 2022
भारतीय संघात केवळ एक बदल करण्यात आला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली याचे पुनरागमन झाले आहे. त्याच्या येण्याने श्रेयस अय्यरला संघाबाहेर बसावे लागले आहे. तर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
असे आहेत दोन्हीही संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, प्रसीद्ध कृष्णा
इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेविड विली, ब्रायडन कार्स, रीस टोपले