वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोस येथे सुरू झाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने या सामन्यातून वनडे पदार्पण केले.
कसोटी मालिकेत 1-0 असा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ ही मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. या सामन्यासाठी भारतीय संघात फिनिशर म्हणून ईशान किशन, हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. तर वेगवान गोलंदाजीची धुरा उमरान मलिक, शार्दुल ठाकूर व मुकेश कुमार सांभाळतील. तर फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव व रवींद्र जडेजा हे सांभाळत आहेत.
दुसरीकडे वेस्ट इंडीज संघात ऍलिक अथनेझ याला पदार्पण करण्याची संधी दिली गेली. याव्यतिरिक्त दीड वर्षानंतर फलंदाज शिमरन हेटमायर पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप(कर्णधार), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, ऍलिक अथनेझ, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोटी
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार
( India Won Toss First ODI Against West Indies Mukesh Kumar Makes Debute)
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप खेळणार का? वनडे रिटायरमेंट घेतलेला स्टोक्स पाहा काय म्हणाला?
आजपासून टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्डकप’! वाचा भारतीय संघाचे विश्वचषकापर्यंतचे सर्व वेळापत्रक