भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शुक्रवारी (27 जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील हा पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
Captain @hardikpandya7 wins the toss and elects to bowl first in the 1st T20 against New Zealand.
A look at our Playing XI for the game 👇👇
Live – https://t.co/9Nlw3mU634 #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/fNd9v9FTZz
— BCCI (@BCCI) January 27, 2023
सलग तिसऱ्या टी20 मालिकेत हार्दिक भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या मालिकेसाठी देखील नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभव विराट कोहली उपलब्ध नाहीत. रांची येथे होत असलेल्या या सामन्यात इशान किशन हा प्रथमच आपल्या घरच्या मैदानावर खेळेल. वनडे मालिकेत मालिकावीर राहिलेल्या शुबमन गिल याला सलामीला संधी देण्यात आली आहे. तर कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर फिरकीची जबाबदारी सांभाळतील. वेगवान गोलंदाजीची धुरा मावी, उमरान मलिक व अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजीचा भार वाहतील.
दुसरीकडे न्यूझीलंड संघाचे नेतृत्व मिचेल सॅंटनर करेल. ईश सोढी व मार्क चॅपमन यांनी संघात पुनरागमन केले आहे. तर, वनडे मालिकेत वेगवान गोलंदाजीचा भार वाहिलेले लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर व जेकब डफी हे संघातील जागा राखण्यात यशस्वी ठरले.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन-
शुबमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन-
फिन ऍलन, डेवॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, जेकब डफी.
(India Won Toss In Ranchi T20I Against Newzealand)