वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा टी२० सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क येथे खेळवला जात आहे. या मालिकेत एकुण ५ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी पहिल्या २ सामन्यातील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने जोरदार पुनरागमन करत मालिकेत १-१ ची बरोबरी केली. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1554491357363703809?t=ZYMGfXVCsjt5OoNQ5fPdGQ&s=19
या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी एक बदल करण्यात आला. भारतीय संघाने अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी युवा दीपक हुडाला संधी दिली. जडेजाला विश्रांती देण्यात आल्याचे कर्णधार रोहित शर्माकडून सांगण्यात आले. दुसरीकडे वेस्ट इंडीजने आपल्या विजयी संघात एक बदल करत ओडेन स्मिथच्या जागी दुसरा अष्टपैलू डॉमिनिक ड्रेक्सला संधी दिली.
दोन्ही संघात खेळवला गेलेला दुसरा सामना खेळाडूंच्या बॅग्स उशीराने पोहल्यामुळे दिरंगाईने सुरू झाला होता. शिवाय त्या कारणाने हा सामना संपायला देखील उशीर झाला. यामुळेच सलग दुसऱ्या दिवशी खेळवला जाणारा तिसरा ट-२० सामनाही उशीराने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा सामना नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशीराने सुरू झाला आहे.
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी उभय संघ-
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
वेस्ट इंडीज-
ब्रेंडन किंग, शिमरन हेटमायर, रोवमन पॉवेल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक/कर्णधार), कायले मेयर्स, जेसन होल्डर, अकिल होसेन, डोमेनिक ड्रेक्स, अल्झारी जोसेफ, ओबेद मेकॉय, डेवॉन थॉमस.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी
भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक
तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल






