---Advertisement---

पाकिस्तानचा पराभव टीम इंडियाच्या पथ्यावर! WTC फायनलच्या अपेक्षा उंचावल्या; असे आहे समीकरण

---Advertisement---

तब्बल सतरा वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत असलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या कसोटीवर कब्जा केला. रावळपिंडी येथे झालेल्या या कसोटीत ‌ अखेरच्या दिवशी इंग्लंडने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत यजमान पाकिस्तानला 74 धावांनी नमवले. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्याचा फायदा भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत झाला.

 

रावळपिंडी कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे जाण्याची वाट बिकट झाली आहे. तर, दुसरीकडे भारतीय संघाच्या मार्गातील एक महत्त्वाचा अडसर दूर झाला.

पाकिस्तानचा संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचे 46.67 टक्के गुण आहेत. या यादीत ऑस्ट्रेलिया 72.73 टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका 60 टक्के गुणांसह दुसऱ्या तर, 53.33 टक्के गुणांसह ‌ श्रीलंकेचा तिसरा क्रमांक लागतो. त्यानंतर भारतीय संघ 52.08 टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तानच्या पराभवामुळे भारतीय संघाला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेतील एखादा सामना भारतीय संघाने गमावला तरी चालणार आहे. मात्र, त्याचवेळी बांगलादेश दौऱ्यावरील दोन्ही कसोटीत भारताला विजय संपादन करावा लागेल. ‌‌या स्थितीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकेवरही भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे. कारण, दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यास ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतात.

भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र, न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा पराभव करत ही स्पर्धा आपल्या नावे केलेली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सायकलचा अंतिम सामना जून 2023 मध्ये ओव्हल येथे खेळला जाईल.

(India WTC Final Hopes Increase After Pakistan Loss In Rawalpindi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

बीसीसीआयचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय! यंदाच्या रणजी ट्रॉफीत दिसणार कधीही न घडलेली गोष्ट 

बीसीसीआयचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय! यंदाच्या रणजी ट्रॉफीत दिसणार कधीही न घडलेली गोष्ट 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---