आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसी सध्या 2022 या वर्षांचे आयसीसी पुरस्कार जाहीर करत आहे. आयसीसीने बुधवारी (25 जानेवारी) मागील वर्षी पदार्पण करत आपल्या शानदार खेळाने लौकिक वाढवणाऱ्या युवा खेळाडूचा सन्मान केला. महिला विभागात आयसीसी एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार भारताची युवा वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर हिने पटकावला. तिने या स्पर्धेत आपलीच संघ सहकारी यास्तिका भाटिया, ऑस्ट्रेलियाची डार्सी ब्राऊन व इंग्लंडच्या एलिसा कॅप्सी यांना मागे टाकले.
Impressing everybody with her magnificent displays of seam and swing bowling, the ICC Emerging Women's Cricketer of the Year had a great 2022 👌#ICCAwards2022
— ICC (@ICC) January 25, 2023
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या भविष्यातील वेगवान आक्रमणाची प्रमुख म्हणून रेणुका हिच्याकडे पाहिले जाते. तिने मागील वर्षी वनडे व टी20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. 26 वर्षीय रेणुकाने मागील वर्षी भारतासाठी 7 वनडे सामने खेळले. त्यामध्ये तिने 4.62 च्या इकॉनॉमी रेटने 18 बळी टिपले. तसेच, 22 टी20 बळी मिळवण्यात देखील तिला यश आले. भारतीय संघाने यावर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला होता. भारताच्या या यशात तिचा मोठा वाटा राहिला. त्यानंतर झालेल्या पहिल्या टी20 आशिया चषकात देखील भारताने विजय मिळवला होता. या स्पर्धेतील भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणारी गोलंदाज ठरली.
रेणुका सिंग हिला झुलन गोस्वामी हिची वारसदार म्हणून ओळखले जाते. रेणुका नव्या चेंडूने दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्यात माहिर आहे. तिच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीचा विचार केल्यास 7 वनडेत 18 बळी मिळवण्यासाठी यशस्वी ठरली असून, 25 वनडेत 23 बळी तिच्या नावे जमा आहेत.
(India Young Pacer Renuka Singh Thakur Won ICC Womens Emerging Cricketer Of The Year 2022 Award)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC ODI Rankings: शानदार शुबमनसह रोहितही टॉप 10मध्ये, पण विराटला बसला फटका
सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा, भल्याभल्यांना पछाडत वनडे रँकिंगमध्ये बनला अव्वल गोलंदाज