भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या यूएस मास्टर्स टी10 2023 या स्पर्धेत कॅलिफोर्निया नाईट्सकडून खेळत आहे. इरफानच्या गोलंदाजीची प्रर्धेमध्ये सर्वत्र चर्चा होत आहे. ड्वेन स्मिथ आणि हॅमिल्टन मसाकादझा या दोन अनुभवी फलंदाजांसमोर त्याने शेवटच्या षटकात 9 धावा वाचवून संघाला विजय मिळवून दिला. इरफानने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. 11 वर्षानंतरही त्याने वयाच्या 38 व्या वर्षी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
कॅलिफोर्निया नाईट्स आणि अटलांटा रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात इरफान पठाण (Irfan Pathan) याने उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅलिफोर्निया नाईट्स संघाने 10 षटकात 2 बाद 94 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना अटलांटा रायडर्सला 10 षटकांत 4 गडी गमावून 89 धावाच करता आल्या. या सामन्यात कॅलिफोर्निया नाईट्सला विजयी करण्यात इरफानने महत्त्वाची भूमिका बजावली.
सामन्याच्या शेवटच्या षटकात अटलांटा रायडर्सला विजयासाठी 9 धावांची गरज होती. कॅलिफोर्निया नाईट्सकडून शेवटचे षटक टाकणाऱ्या इरफानने अवघ्या 3 धावा देत आपल्या संघाला 5 धावांनी विजय मिळवून दिला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इरफान पठाने वाईड गोलंदाजी केली. आता 6 चेंडूत 8 धावा हव्या होत्या. यानंतर पहिला चेंडू इरफानने झिम्बाब्वेचा माजी फलंदाज मसाकादझाला टाकला. दुसऱ्या चेंडूवर मसाकादझाने एक धाव घेतली.
त्यानंतर इरफान पठाणने तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या फलंदाज ड्वेन स्मिथला वाईडच्या रेषेवर चेंडू फेकला, ज्यावर तो फक्त एक धाव घेऊ शकला. यानंतर चौथ्या चेंडूवर इरफानने मसाकादझाचा झेल देऊन तंबूचा रस्ता दाखवला. पाचव्या चेंडूवर फलंदाजीला आलेला नवा फलंदाज हम्माद आझम खाते न उघडताच धावबाद झाला. आता शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती आणि ड्वेन स्मिथ क्रीजवर उपस्थित होता. इरफानने शेवटचा चेंडू डॉट टाकत त्याच्या संघाने 5 धावांनी विजय मिळवला. (indian all rounder irfan pathan saved 9 run in usa masters t10 league)
महत्वाच्या बातम्या-
एशियन गेम्ससाठी ‘हा’ दिग्गज बनला ऋतुराज ब्रिगेडचा गुरु, सुवर्णपदकाचे ठेवले लक्ष्य
किती ही उदासीनता? भारतीय महिला संघ 9 महिन्यांपासून प्रशिक्षकांविना, बीसीसीआयचे दुर्लक्ष