इंग्लंड संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघ कसोटी मालिकेनंतर टी२० मालिका खेळत आहेत. ही मालिका संपल्यानंतर उभय संघात वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. परंतु भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा इंग्लंडविरुद्ध कोणत्याही स्वरुपातील मालिकेचा भाग नाही. त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
जडेजा इंस्टाग्राम अकाउंटद्वारे चाहत्यांना त्याच्या फिटनेसची माहिती देत असतो. अशात नुकताच त्याने काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत जडेजा आपल्या मित्रांसमवेत जंगल सफारीवर गेला असल्याचे दिसत आहे. दरम्यान अचानक त्यांच्या गाडीपुढे एक वाघ येतो. त्या वाघाला पाहून सर्वजण काही वेळासाठी स्तब्ध होतात. तो वाघ थोडावेळ इकडे तिकडे पाहातो आणि परत जंगलातील झुडूपात निघून जातो. हा व्हिडिओ शेअर करत जडेजाने लिहिले आहे की, ‘तो वाघ मला दुखापतीतून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा द्यायला आला होता.’
जडेजाच्या या व्हिडिओ चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी जडेजा स्वत: वाघ असल्याचे संबोधत दोन वाघ एकमेकांसमोर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/CMoV-UgJI5Q/?utm_source=ig_web_button_share_sheet
जडेजाला क्रिकेटव्यतिरिक्त प्राण्यांची खूप आवड आहे. तो बऱ्याचदा त्याच्या तब्येल्यातील घोड्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाली होती दुखापत
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिडनी कसोटीदरम्यान जडेजाच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्याचा अंगठा फ्रक्चर झाला होता. मात्र सध्या तो पूर्णपणे दुखापतीतून सावरला असून सराव करतानाही दिसला आहे. तरीही त्याला विश्रांतीसाठी अजून कालावधी देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेच्या कॅम्पमध्ये ‘वाथी कमिंग’ची हवा, ऋतुराजसह ‘यांनी’ धरला ताल; पाहा झक्कास व्हिडिओ
“मिस्बाह-उल-हक म्हणजे गरिबांचा एमएस धोनी,” पाकिस्तानी दिग्गजाचं मोठं भाष्य





