---Advertisement---

क्या बात!! भारतीय वंशाच्या अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने पटकावले विम्बल्डन ज्युनियरचे जेतेपद

On: सोमवार, जुलै 12, 2021 3:12 AM
---Advertisement---

टेनिस विश्वात भारतीय मूळच्या एका युवा खेळाडूने घवघवीत यश मिळवले आहे. भारतीय मूळचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने विम्बल्डन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ज्युनियर ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. समीरने रविवारी (११ जुलै) अंतिम सामन्यात विक्टर लिलोवला पराभूत केले आहे. समीरने विक्टर लिलोवला सरळ सेटमध्ये ७-५, ६-३ ने पराभूत केले आहे.

समीर या सामन्यात विजय मिळवण्याचा उद्धेशानेच मैदानात उतरला होता. मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना असल्यामुळे अनेक खेळाडू दबावात येत असतात, परंतु समीरने संपूर्ण सामन्यात असे जाणवू दिले नाही की,तो दबावात आहे. त्याने विक्टर लिलोववर सुरुवतीपासूनच दबाव बनवून ठेवला होता. ज्यामुळे त्याला या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले.

समीरने या सामन्यात आपले वर्चस्व शेवटपर्यंत वर्चस्व ठेवले होते. त्याने या एकतर्फी सामन्यात विक्टर लिलोववर सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. काही काही ठिकाणी विक्टर लिलोवने दबावातून बाहेर येऊन आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, समीरने चांगली सर्व्हिस आणि काही चांगले शॉट मारत पहिला सेट ७-५ ने आपल्या नावावर केला होता.

पहिल्या सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर विक्टर लिलोव चुका करताना दिसून आला होता, ज्याचा समीरने पूर्णपणे फायदा घेतला. ज्यामुळे हळू हळू हा सामना विक्टर लिलोवच्या हातातून निसटला. तसेच दुसरा सेट देखील समीरने ६-३ ने आपल्या नावावर करत ज्युनियर जेतेपद पटकावले.

महत्त्वाच्या बातम्या – 

“कोणीतरी येणार येणार गं!” क्विंटन डी कॉक कुटुंबात होणार नवीन सदस्याचे आगमन, ‘अशी’ पोस्ट करत दिली माहिती

नोवाक जोकोविचने जिंकले कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम; वाचा त्याच्याबद्दलची अचंबित करणारी आकडेवारी 

दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडला पराभवाचा धक्का देत मालिकेत केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---