---Advertisement---

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर झाला सीमेवर तुफान जल्लोष; पाहा देशाच्या जवानांचा आनंदोत्सव

On: सोमवार, ऑक्टोबर 24, 2022 5:16 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) महासंग्राम सुरू आहे. त्यामध्ये रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर थरारक सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने विजय मिळवला आणि भारताच्या टी20 विश्वचषकाच्या प्रवासाला उत्तम सुरूवात झाली. भारताच्या विजयानंतर संपूर्ण देशभरात चाहते जल्लोष करत आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये भारतीय सैन्याचे जवान आनंदाने नाचताना दिसतायेत.

पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतात ठिकाणी चाहते आनंद साजरा करतायेत. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आपापल्या पद्धतीने या विजयाचा आनंद घेताना दिसले. त्याचवेळी अहोरात्र देशाच्या सीमेवर भारतीयांचे रक्षण करणारे भारतीय जवान देखील या आनंदात सामील झाले.

https://twitter.com/sachinpathankot/status/1584249450993631232?s=46&t=QURVbVIzTGYs19-IhkJ9gw

 

पठाणकोट येथील भारतीय सैन्याच्या तळावर भारतीय सैनिक हा जल्लोष साजरा करताना दिसले. अनेकांनी या आनंदात भांगडा करत तसेच नाचून आनंद व्यक्त केला. तर काहींनी ढोलक वाजवत भारतीय संघाच्या या विजयानंतर आपली आवडही जपली.

या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारताने या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी केली. पाकिस्तानने फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावा केल्या. यामुळे शान मसूद (52*) आणि इफ्तिखार अहमद (51) यांनी अर्धशतके केली. भारताच्या गोलंदाजीत हार्दिक आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित-राहुल लवकर बाद झाले. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी विकेट देत भारतीय चाहत्यांची चिंता वाढवली. तेव्हा विराट-हार्दिक जोडीने शतकी भागीदारी केली. विराटने नाबाद 82 आणि हार्दिकने 40 धावा केल्या. सामनावीर पुरस्कार विराटला देण्यात आला. भारताचा पुढील सामना 27 ऑक्टोबरला नेदरलॅंड्सविरुद्ध आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पराभव पाकिस्तानचा झळ मात्र ऑस्ट्रेलियाला! भारताकडून 19 वर्ष जुना विश्वविक्रम मोडीत
शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---